धुळ्यात मराठा क्रांती मोर्चा कडून चंद्रकांत पाटलांचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न

धुळ्यात मराठा क्रांती मोर्चा कडून चंद्रकांत पाटलांचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न
chandrkant

धुळे - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी कोल्हापुरातील Kolhapur  झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं होत की, चोखलेला आंबा कापता कसा येईल ? आणि छत्रपती संभाजी राजे Sambhaji raje यांना भाजपानं पक्ष म्हणून किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच केला गेलेला सन्मान हा बहुदा इतरांना माहित नाही, असं वक्तव्यही त्यांनी केलं होतं. Attempt to burn the statue of Chandrakant Patil by Maratha Kranti Morcha in Dhule

ह्या केलेल्या वक्तव्याचा निषेध करत शहरातील संभाजी पुतळ्याच्या समोर चंद्रकांत पाटलांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध करण्यात आला आहे तसेच मराठा क्रांती मोर्चा Maratha Kranti Morcha कडून चंद्रकांत पाटील यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. परंतु पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करीत आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून धुळे शहरातील जुन्या महानगरपालिकेसमोर मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आपला आक्रोश व्यक्त केला असून पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत पुतळा व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. Attempt to burn the statue of Chandrakant Patil by Maratha Kranti Morcha in Dhule

यावेळी मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक मनोज मोरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, या पुढे मराठा समाजाबद्दल आणि संभाजी राज्यांनबद्दल असं वक्तव्य केलं तर संपूर्ण महाराष्ट्रात भाजपाच्या नेत्यांना काळे फासले जाईल असा गंभीर इशारा यावेळी देण्यात आला.

Edited By - Shivani Tichkule

हे देखील पहा -

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com