औरंगाबादकरांनो खुशखबर ! तुमच्या सेवेत लवकरच इंडिगोची विमानसेवा 

औरंगाबादकरांनो खुशखबर ! तुमच्या सेवेत लवकरच इंडिगोची विमानसेवा 

औरंगाबाद : "इंडिगो'ने औरंगाबाद विमानतळावरून विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर येथे दोन कर्मचारी नियुक्त केले होते. शिवाय विमानतळावर बुकिंग काउंटरसाठी जागा घेतली होती. काही दिवसांपूर्वी शिर्डी येथील विमाने औरंगाबाद येथे उतरविण्यात येत असल्याने "इंडिगो'चे काही कर्मचारी औरंगाबाद येथे होते.  चिकलठाणा विमानतळावरुन फेब्रुवारीपासून दिल्ली, हैद्राबाद आणि मुंबई या शहरांसाठी इंडिगो विमान कंपनीची सेवा सुरू होणार आहे. हैद्राबाद आणि नवी दिल्लीकडे दुपारच्या सत्रात तर मुंबईकडे सकाळच्या सत्रात विमान झेपावणार आहे. 
चिकलठाणा विमानतळावरुन फेब्रुवारीपासून दिल्ली, हैद्राबाद आणि मुंबई या शहरांसाठी इंडिगो विमान कंपनीची सेवा सुरू होणार आहे. हैद्राबाद आणि नवी दिल्लीकडे दुपारच्या सत्रात तर मुंबईकडे सकाळच्या सत्रात विमान झेपावणार आहे. 

इंडीगोने जाहिर केल्याप्रमाणे 5 फेब्रुवारीपासून हैद्राबाद, मुंबई आणि दिल्ली या तीन शहरांसाठी विमान सुरू करण्यात येणार आहे. इंडिगोचे मुंबई येथून सकाळी 6.25 वाजता विमान औरंगाबादकडे रवाना होईल सकाळी 7.25 वाजता औरंगाबादेत विमान दाखल होईल. त्यानंतर हेच विमान सकाळी 9.15 वाजता मुंबईच्या दिशेने उड्डाण घेईल. 

दिल्ली येथून दुपारी 2 वाजून 5 मिनिटांनी निघालेले विमान औरंगाबादेत 3 वाजता दाखल होईल. त्यानंतर 4.55 वाजता हे विमान दिल्लीकडे जाण्यासाठी उड्डाण घेईल. सायंकाळी 6.40 वाजता ते दिल्लीमध्ये पोचेल. हैदराबाद येथून सकाळी 11 वाजता हे विमान औरंगाबादसाठी उड्डाण घेईल. दुपारी 12.10 वाजता औरंगाबादेत दाखल झाल्यानंतर पुन्हा हैदराबादला जाण्यासाठी हे विमान दुपारी 12.40 वाजता उड्डाण करेल. दुपारी 1.45 वाजता हे विमान हैदराबादला पोचेल. 

औरंगाबादहून हैदराबादला विमानसेवा सुरू झाल्याने तिरुपती चेन्नईकडे जाणाऱ्या भाविकांना नविन विमानसेवेची सोय होणार आहे. तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांना रेल्वे मार्गाशिवाय पर्याय नव्हता, आता मात्र प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. गेल्या वर्षापर्यंत तोकडी विमानसेवा असलेल्या चिकलठाणा विमानतळावरून विविध विमान कंपन्या सेवा देण्यास तयार झाल्याने शहराच्या पर्यटन आणि व्यापार उद्योग वाढीसाठी मदत होणार आह

Web Title: Aurangabad, good news! Indigo Airlines at your service soon

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com