मौखिक निरीक्षणावरून झाले शवविच्छेदन, महाराष्ट्रातील पहिलाच प्रकार !

मौखिक निरीक्षणावरून झाले शवविच्छेदन, महाराष्ट्रातील पहिलाच प्रकार !
beed 3beed 3

बीड - बीडमधील दिप हॉस्पिटलमध्ये आत्महत्या Suicide केलेल्या 'त्या' कोरोना बाधित Covid Affected व्यक्तीचे मौखिक निरीक्षणाद्वारे शवविच्छेदन Autopsy By Oral Examination झाले आहे. संसर्ग वाढू नये यामुळे, मयत कोरोना बाधित रुग्णाची चिरफाड न करता, शवविच्छेदन करावे अशा सूचना आयसीएआरने ICMR केल्या होत्या. त्याप्रमाणेच हे शवविच्छेदन झाले असून ही महाराष्ट्रातील Maharashtra पहिलीच  Fisrt घटना Case असल्याचे नोंदवण्यात आले आहे. Autopsy By Oral Examination First Case In Maharshtra

हे देखील पहा -

बीड शहरातील दिप हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार घेणाऱ्या, रामलिंग सानप या ऊसतोड कामगाराने काल गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यामुळे संबंधित मयताच्या नातेवाईकांनी, डॉक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे ही आत्महत्या झाली असून, मृतदेहाचे शवविच्छेदन करून हॉस्पिटल वर गुन्हा दाखल करावा अशी मागणी पोलिसांकडे केली होती.

यामुळे बीड शहर पोलिसांनी Police, जिल्हा रुग्णालयाकडे या मृतदेहाचे शवविच्छेदन करावे, अशी मागणी केली होती. तर असे शवविच्छेदन याआधी कधीच झाले नाही त्यामुळे काय करावे? या विचारात आरोग्य प्रशासन होते. मात्र अखेर आयसीएमआरच्या सुधारित निर्देशाप्रमाणे, मृतदेहाचे मौखिक निरीक्षणावरून शवविच्छेदन करण्यात आले आहे. दरम्यान देशातील दुसरी तर महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना आहे. Autopsy By Oral Examination First Case In Maharshtra

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com