बच्चू कडू यांनी दखल घेऊन कोविड प्लाझ्मा विलगीकरण कक्ष तात्काळ सुरु करण्याचे दिले आदेश

बच्चू कडू यांनी दखल घेऊन कोविड प्लाझ्मा विलगीकरण कक्ष तात्काळ सुरु करण्याचे दिले आदेश
bacchu

अकोला : Akola येथील युवाविश्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. संतोष गावंडे Santosh Gawande यांनी जिल्हा सर्वोपचार कोविड प्लाझ्मा Plasma विलगीकरण कक्ष सुरु करण्याकरिता पालकमंत्री बच्चू कडू bacchu kadu यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले व याविषयी सविस्तर माहिती पालकमंत्री यांना दिली.  Bachchu Kadu took note and ordered to start the covid plasma separation room immediately

कोविड Covid या आजारामध्ये इतर औषधोपचारासोबत प्लाझ्मा हे प्रतिजैविक म्हणून काम करते. अकोला जिल्ह्यात प्लाझ्मा विलगीकरण कक्ष फक्त जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आला होता, जिल्ह्यात ईतर कोणत्याही रक्तपेढीला ती मान्यता नाही. मध्यंतरीच्या कालावधीत राज्यात अकोला आरोग्य विभागामध्ये कोविड 19 च्या रुग्णांचे प्रमाण सगळ्यात जास्त वाढले होते तरी देखील जवळपास मागील 7 महिन्यांपासून जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील कोविड प्लाझ्मा विलगीकरण कक्ष बंद करण्यात आला होता. याचा फार मोठा त्रास कोविड रुग्णांना अणि त्यांच्या नातेवाईक यांना होत होता. नाइलाजास्तव रुग्णांच्या नातेवाईकांना अमरावती व नागपूर येथून प्लाझ्मा आणावा लागत होता. 

अकोला जिल्ह्यातील कोविड रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना होणारा मनस्ताप व आर्थिक भुर्दंड लक्षात घेता जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाने कोविड प्लाझ्मा विलगीकरण कक्ष तात्काळ सुरू करावा अशी मागणी अ‍ॅड. संतोष गावंडे यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांचेकडे केली. Bachchu Kadu took note and ordered to start the covid plasma separation room immediately

यावेळी अ‍ॅड.गावंडे यांचेसोबत साथ ब्लड हेल्पलाइनचे आशिष कसले, युवाविश्वचे अ‍ॅड. ऋषिकेश जुनारे, जयाताई बोचे जुनारे, अविनाश नाकट व संदिप महल्ले उपस्थित होते. पालकमंत्री यांनी या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन ध्वजारोहण झाल्याबरोबर ताबडतोब सर्वोपचार रुग्णालयात जाऊन कोविड प्लाझ्मा विलगीकरण कक्ष तात्काळ कार्यान्वित करण्याचे आदेश दिले.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com