बदलापुरची शवदाहिनी अवघ्या महिन्याभरात पुन्हा बंद

बदलापुरची शवदाहिनी अवघ्या महिन्याभरात पुन्हा बंद
badlapur news

बदलापूर - शहराच्या पश्चिमेला असलेल्या सर्वात मोठ्या मांजर्ली स्मशानभूमीतील डिझेल शवदाहिनी crematorium अवघ्या काही दिवसातच पुन्हा बंद पडली आहे. त्यामुळे येथे अंत्यसंस्कार Funeral करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांवर खर्चिक अशा पारंपरिक पद्धतीने दहन करण्याची वेळ आली आहे.  Badlapur crematorium closed again in just a month

करोनामुळे मृत्यू पावणारे आणि इतर अशा सर्वच मृतांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी होत असल्याने संसर्गाचा धोका वाढण्याची भीती निर्माण होत आहे. त्यामुळे ही डिझल Diesel शवदाहिनी तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत शहरात मृत्यूंची संख्या वाढल्याने या शवदाहिनीवर मोठा भार पडला आहे. करोनाच्या संकटात या शवदाहिनीचा मोठा वापर झाला. या शवदाहिनीत मोफत दहन केले जाते. त्यामुळे शहरातील गोरगरीब नागरिकांच्या नातलगांचे मोफत अंत्यविधी होतात.

डिसेंबर महिन्यात ही शवदाहिनी काही तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली होती. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात पालिका प्रशासनाने या शवदाहिनीची दुरूस्ती करून ती नागरिकांसाठी खुली केली. मात्र अवघ्या काही दिवसातच ही शवदाहिनी पुन्हा एकदा बंद पडली आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा पारंपारिक अंत्यसंस्कारांकडे वळण्याची वेळ आली आहे.  त्यामुळे ही डिझेल शवदाहिनी तातडीने दुरूस्त करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com