महागाई विरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे धक्का मारो आंदोलन

महागाई विरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे धक्का मारो आंदोलन
Saam Banner Template (53)

इंदापूर - पेट्रोल Petrol,गॅस Gas,तेल Oil महागाई inflation व वाढत्या वीज बिलाच्या विरोधात व केंद्र सरकार Central Government, राज्य सरकारच्या State Government धोरणांविरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे Bahujan Mukti Party राष्ट्रीय महासचिव ॲड.राहुल मखरे यांच्या नेतृत्वाखाली बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आज इंदापूर तहसील कार्यालयावर धक्का मारो आंदोलन करण्यात आले. Bahujan Mukti Partys movement against inflation

यावेळी शेकडो दुचाकी गाड्यांना धक्का मारत इंदापूर नगरपरिषदे पासून तहसील कचेरी पर्यंत महागाई की मार ईव्हीएम की सरकार,काँग्रेस,बीजेपी ने क्या किया?देश का सत्यानाश किया, ये सरकार वो सरकार चोर लुटोरो की सरकार,वाह रे मोदी तेरा खेल सस्ती दारू मंहगा तेल अशा विविध घोषणाबाजी करत तशा प्रकारचे फलक दर्शवित शेकडो कार्यकर्ते व महिला सहभागी होत्या.

हे देखील पहा -

दरम्यान पेट्रोल-डिझेल गॅसच्या भरमसाठ वाढलेल्या किंमती कमी करा,खाद्यतेल तसेच जीवनावश्यक खाद्य पदार्थांचे भाव कमी करा,वीज बिल माफ करा,महागाई कमी करता येत नसेल तर खुर्ची खाली करा अशा विविध मागण्यांच्या संदर्भातील निवेदन तहसीलदार अनिल ठोंबरे यांना देण्यात आले.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com