भारतीय बँकिंग व्यवस्था भक्कम आणि सुरक्षित असल्याची ग्वाही 

भारतीय बँकिंग व्यवस्था भक्कम आणि सुरक्षित असल्याची ग्वाही 

मुंबई - पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवरील निर्बंध आणि त्यानंतर सोशल मीडियावर बँकिंग व्यवस्थेबाबत व्हायरल झालेल्या संदेशांमुळे निर्माण झालेला संभ्रम रिझर्व्ह बँकेने मंगळवारी (ता.1) दूर केला. भारतीय बँकिंग व्यवस्था भक्कम आणि सुरक्षित असल्याची ग्वाही रिझर्व्ह बँकेने ट्विटरद्वारे दिली.

बँकिंग व्यवस्थेविषयी सोशल मीडियावरील अफवांवर नागरिकांनी विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन "आरबीआय" ने केले आहे. पीएमसी बँकेवरील निर्बंधांनंतर काही बँका बंद होणार अशा प्रकारचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याशिवाय भांडवली बाजारात बँकिंग शेअर्समधील पडझडीने नागरिकांमध्ये बँकांविषयी गैरसमज निर्माण झाल्याचे "आरबीआय"च्या निदर्शनात आले.

या परिस्थितीची दखल घेत बँकेने ट्विटरद्वारे नागरिकांना अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. बँकिंग व्यवस्था भक्कम, स्थिर आणि सुरक्षित असल्याचे आरबीआयने ट्विट केले आहे.


Web Title: banking system is strong and secure RBI
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com