सलग पाच दिवस बँका राहणार  बंद

सलग पाच दिवस बँका राहणार  बंद

नवी दिल्ली:  बँकांशी संबंधित असणारे कोणतेही काम असो...ते २५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याची खबरदारी घ्या...कारण २६ ते २९ सप्टेंबर या कालावधीत देशभरातील बँका बंद राहणार असून, थेट ३० सप्टेंबरला बँका उघडणार आहेत. असे असले तरी, अर्धवार्षिक कामांच्या पूर्ततेसाठी कोणतेही व्यवहार होणार नसल्याने ग्राहकांना थेट १ ऑक्टोबरला बँकांची पायरी चढावी लागणार आहे. बँकांच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसीय संपाची घोषणा केली असल्याने २६ आणि २७ सप्टेंबरला बँका बंद राहणार आहेत. तर, २८ आणि २९ सप्टेंबर रोजी अनुक्रमे शनिवार आणि रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. २८ आणि २९ सप्टेंबरला शेवटचा शनिवार आणि रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे पंचवीस सप्टेंबरनंतर बँका सलग चार दिवस बंद राहणार आहेत. ‘बँका सलग पाच दिवस बंद राहणार असल्याने त्याचा परिणाम थेट एटीएम रोख रकमेविना कोरडीठाक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक किंवा दोन दिवस ग्राहक ही अडचण सहन करण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतरही एटीएम बंद पडल्यास ग्राहकांना रोख रक्कम मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. बँका बंद असल्यास एटीएममध्ये रोख रक्कम टाकण्याचे कष्ट सहसा घेतले जात नाहीत.


बँका बंद असण्याचा सर्वांत मोठा फटका धनादेश वटण्याच्या प्रक्रियेला बसण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार २५ सप्टेंबर रोजी बँकेत भरलेला धनादेश ३ ऑक्टोबरला वठण्याची शक्यता आहे. २५ सप्टेंबरला भरलेला धनादेश वठण्याची प्रक्रिया ३० सप्टेंबरला सुरुवात होईल. त्यामुळे तो वठण्यास ऑक्टोबर उजाडावा लागेल. पुन्हा २ ऑक्टोबरला सरकारी सुट्टी असल्याने संबंधितांच्या खात्यामध्ये तीन ऑक्टोबरला रक्कम जमा होईल. पाच दिवस बँका बंद

२६ व २७ सप्टेंबर : विलीनीकरणविरोधात संप
२८ सप्टेंबर : चौथा शनिवार
२९ सप्टेंबर : रविवार
३० सप्टेंबर : अर्धवार्षिक हिशेब
 

Web Tittle: banks to remain close from sep 26 to 30 services to be affected

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com