बार्शीत सोपलांचा पराभव करणाऱ्या राऊतांचा भाजपला पाठिंबा 

बार्शीत सोपलांचा पराभव करणाऱ्या राऊतांचा भाजपला पाठिंबा 

मुंबई : बार्शी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार दिलीप सोपल यांचा पराभव करणारे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांनी भाजपला आपला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. महायुतीमध्ये जागा शिवसेनेला सुटल्याने राऊत यांनी बंडखोरी केली होती.

बार्शीमधून राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले दिलीप सोपल यांचा पराभव भाजपचे बंडखोर राजेंद्र राऊत यांनी केला होता. त्यांना 95 हजार 482 मते मिळाली, तर सोपल यांना 92 हजार 406 मते मिळाली होती. 

बार्शीत पहिल्यापासूनच अटीतटीची लढत झाली. बार्शीत आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश करत शिवसेनेकडून आणि त्यांना त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी राजेंद्र राऊत यांनी अपक्ष लढत दिली.

Web Title: Barshi independent MLA Rajendra Raut support to BJP

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com