सावधान! तुमच्या फेक प्रोफाईल बनवून कोणी तरी मागतंय पैसे

सावधान! तुमच्या फेक प्रोफाईल बनवून कोणी तरी मागतंय पैसे
froud

मुंबई: सावधान तुमच्या नावे कोणीतरी पैसे मागतंय. ऐकून तुम्हाला धक्का बसला ना.  मात्र हे खरं आहे. सध्या सायबर गुन्हेगारी आपलं जाळं फोफावत आहे. या जाळ्यात तुम्ही-आम्ही कोणीही अडकू शकतो. या प्रकरणा  संदर्भात सायबर विभागाकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या आहे.  सायबर माफिया तुमच्या फेसबुक अकाऊंडाचा वापर करत असतात. आणि याची तुम्हाला साधी कल्पाना देखील नसते. तुमच्या डोळ्या देखत हे माफिया तुमचं खोटं फेसबूक अकाऊंड बनवून तुमच्या सहकाऱ्यांच्या, मित्रांच्या खिश्यावर डल्ला टाकत असतानाच समोर आलं अहे. (Be careful Someone is asking for money by creating your fake profile)

कशी होते फसवणूक

मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, सायबर माफिया तुमच्या फेसबुक अकाऊंडवर नजर ठेवून असतात. तुमच्या अकाऊंडमध्ये किती मित्र आहेत. कोणाशी तुमचा फेसबूकद्वारे जास्त संपर्क असतो. त्याचबरोबर कोणाशी कमी संपर्क असतो याची रेकी हे माफिया करत असतात. आपल्या फायद्याचं सावज शोधून हे सायबर माफिया कोण्या एका व्यक्तीला हेरत असतात. आणि त्याची फेक फेसबूक प्रोफाईल बनवत असतात. आणि फेसबूक वरील तुमच्या मित्रांना पैशांची मागणी घातल असतात. यासाठी ते फेसबूकवरुन बँकेचे डिटेल्स तुम्हाला फेसबूक मेसेंजरद्वारे पाठवत असतात. सायबर गुन्हेगार समोरील व्यक्तीला अशी करणं सांगत असतात की, जेणेकरुन कुणीही सहज भावनिक होवून आपला खिसा रिकामा करतो. या फसवूकीला स्वत: पोलिस देखील बळी पडले आहे. अनेक पोलिसांची अशी फसवणूक  झाली आहे. मात्र पोलिस दलाकडून याची माहिती उपलब्ध झाली नाही.  फेक प्रोफाइल प्रकरणी मुंबईच्या सायबर पोलिसात जानेवारी ते एप्रिल 35 गुन्ह्यांची नोंद आहे.

हे देखील पाहा

महिने              गुन्हे दाखल         गुन्हे उघडकिस
जानेवारीत              3                           2
फेब्रुवारीत               5                           2
मार्च                       9                          3
एप्रिल                     18                         3

सायबर गुन्हेगारांकडून फेसबूकवर दिली जाणारी कारणं सायबर गुन्हेगार फेसबूक मेसेंजर द्वारे काही कारणं देत असतो. यात सायबर गुन्हेगार; मी एका अमुक ठिकाणी अडकलो आहे . माझ्याकडे पैसे नाहीत मला या बँकेच्या अकाऊंडमध्ये पैसे द्या, किंवा मग खूप मेडिकल एमर्सजन्सी आहे. घरातील सदस्य रुग्णालयात दाखल आहे. थोडी पैशांची मदत करा असू सांगून एखाद्या व्यक्तीच्या खिशावर डल्ला मारला जातो. 

किती गुन्ह्यांची नोंद झाली? 

कोरोनाच्या काळात या संंबंधिच्या गुन्ह्याची नोंद मोठ्या प्रमाणावर झाली आहे. जे गुन्हे दाखल झाले आहेत त्यांचा तपास सुरु असल्याचं देखील मुंबई पोलिसांकडून सांगण्यात येते आहे. 2020 या वर्षी 2500 गुन्ह्यांची नोंद झाली असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे. तसंच या वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत 770 गुन्ह्यांच्या नोंदी झाल्या आहे.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com