मृताच्या नातेवाईकांकडून इंटर्न डॉक्टरला मारहाण 
latur shaskiy vaidyakiy mahavidyalay.jpg

मृताच्या नातेवाईकांकडून इंटर्न डॉक्टरला मारहाण 

लातूर : लातूर Latur  येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या Vilasrao Deshmukh Government Medical College सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये रात्री प्रचंड  राडा झाला.  कोविड सदृश्य आजाराने एका पेशंटचा मृत्यू झाला होता. (Beaten intern doctor by relatives of the deceased) 

याची माहिती तेथील इटर्न डॉक्टरांनी मृताच्या नातेवाईकांना दिली. यानंतर दोन तासांनी मृताचे नातेवाईक आणि मित्रमंडळी तिथे जमा झाली. त्यातील पाच ते सहा जण हे दारू पिलेले होते. त्यांनी इंटर्न डॉक्टर बरोबर वाद घालायला सुरूवात केली. आमच्या रुग्णास तुम्ही जाणून-बुजून मारले, असा आरोप करत तेथील डॉक्टरांना मारहाण केली. ही मारहाण सुरू असताना डॉक्टरांनी ड्युटीवरील सुरक्षारक्षकांना आवाज दिला मात्र त्यावेळी तिथे कोणीही हजर नव्हतं. आयसीयू वार्डतुन हा वाद थेट खालील गेट पर्यंत  सुरु होता. त्यानंतर तेथील सुरक्षा रक्षकांनी डॉक्टरांना वाचवलं. याप्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या तीन लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  उर्वरित दहा जणांचा पोलीस शोध घेत आहेत. 

Edited By - Anuradha Dhawade 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com