धुळ्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलिसांना मारहाण 

धुळ्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलिसांना मारहाण 
Beating the police who took action on people who not wearing mask

धुळे : कोरोना Corona काळात नियमाचे उल्लंघन करून काही बहादूर लोक रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसतात. त्यामुळे मास्क न लावणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. अश्याच प्रकारे मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या दोघा पोलिसांना Police चौघांनी मारहाण केल्याची घटना शिरपूर Shirpur तालुक्यात घडली. तालुक्यातील थाळनेर पोलीस ठाण्या अंतर्गत शिरपूर-चोपडा रोडवरील भाटपूरा पोलीस चौकीजवळ हि मारहाणीची घटना घडली आहे. Beating the police who took action on people who not wearing mask  

रात्री उशिरा थाळनेर Thalner पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच यातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौथा साथीदार फरार झाला आहे. पोलीस त्याचा देखील शोध घेत आहेत. 

हे देखील पहा -

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे शासनातर्फे Government आवश्यक कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना तोंडाला मास्क Mask लावणे अनिवार्य केले आहे. तोंडाला मास्क न लावता बाहेर फिरणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलिस प्रशासनास देण्यात आले आहेत. Beating the police who took action on people who not wearing mask  

या आदेशाचे पालन करत असताना पोलिसांनी मास्क न लावता फिरणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याची भुमिका घेतल्याने राग येवून पोलिसांना शिवीगाळ केली, तसेच धक्काबुक्की करीत मारहाण केली. पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली आणि पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By- Sanika Gade

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com