मोहन गुंड | कुंडलिक खांडे
मोहन गुंड | कुंडलिक खांडेSaamTvNews

Beed : अवैध गुटखा विक्री प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुखाला अटक करा

गुटका माफिया शिवसेना जिल्हाप्रमुखाला अटक करा अन्यथा शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा शेतकरी नेते भाई मोहन गुंड यांनी दिला आहे.

बीड : अवैध गुटखा विक्री प्रकरणात शिवसेना जिल्हा प्रमुखाचे नाव येणे ही शरमेची बाब आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेनेची बदनामी होत आहे. जिल्हा प्रमुखावर करवाई करा अशी मागणी शिवसैनिकांनी केलीय. तर दुसरीकडे शेतकरी संघटना आक्रमक झालीय. महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना राजकीय वरदहस्ताने सुरू असलेल्या गुटखा माफियांच्या विरोधात कडक पावले उचलणे गरजेचे आहे.

हे देखील पहा :

व्यसनमुक्तीसाठी आम्ही प्रयत्न करतो, मात्र अशा पद्धतीने सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी गुटखा माफिया असतील तर दाद कुणाला मागायची. त्यामुळं शिवसेना जिल्हाप्रमुखाला अटक करा अन्यथा शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल. असा इशारा शेतकरी नेते भाई मोहन गुंड यांनी दिला आहे.

मोहन गुंड | कुंडलिक खांडे
बापरे...एकाच झाडावर आढळले तीन विषारी कोब्रा! पहा Viral Video

अवैध गुटखा प्रकरणात शिवसेना जिल्हा प्रमुखाचे नाव आल्यानंतर बीडमधील शिवसेना देखील आक्रमक झाली आहे. पोलिसांनी कारवाई केली ती योग्य आहे. मात्र जिल्हाप्रमुख गुटखा माफिया असल्यामुळे शिवसेना पक्षाची व उद्धव साहेबांचे नाव खराब होत आहे. यासंदर्भात मी विरोध केला असता माझ्यावरती गुंड पाठवून मला जिवे मारण्याचा प्रयत्न देखील कुंडलिक खांडे यांनी केला होता. तरुणांना व्यसनाधीन बनवणाऱ्या जिल्हाप्रमुख खांडेवर योग्य ती कारवाई करून पक्षाची मलीन होणारी प्रतिमा वाचवा. अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हनुमान जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com