बीड जिल्हा परिषद करणार 60 लाख वृक्षांची लागवड....!

बीड जिल्हा परिषद करणार 60 लाख वृक्षांची लागवड....!
beed

बीड : बीड Beed जिल्हा Zilla परिषदेने Parishad पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, ग्रामीण भागात तब्बल 60 लाख वृक्षांची Trees लागवड करण्याचे नियोजन आखले आहे. 'एक व्यक्ती तीन झाडे' असा हा कृती कार्यक्रम आहे. Beed Zilla Parishad Will Plant 60 Lakh Trees

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, अजित कुंभार यांच्या संकल्पनेतून हा कृती कार्यक्रम आखला आहे. वृक्ष लागवडी Plantination संदर्भात घेतलेल्या बैठकीत त्यांनी, संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या आहेत.

हे देखील पहा -

दिवसेंदिवस झाडांचे कमी होणारे प्रमाण आणि त्यामुळे निसर्गनिर्मित ऑक्सिजन Oxygen वर होणारा परिणाम, त्याच बरोबर अशुद्ध हवेमुळं मानवी आरोग्यावर होणारा दुष्परिणाम, लक्षात घेऊन जास्तीत जास्त झाडांची लागवड करण्याचे नियोजन, जिल्हा परिषदेने केले आहे. Beed Zilla Parishad Will Plant 60 Lakh Trees

दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना वृक्ष लागवडी संदर्भात सूचना केल्या आहेत. तर ज्या पंचायत समिती चांगलं काम करतील, त्यांना पुरस्कार Award देण्यात येणार आहे. तर जे कर्मचारी अधिकारी या कामात हलगर्जीपणा करतील. त्यांना कारवाईच्या नारळाचा प्रसाद मिळणार. असा सज्जड इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अजित कुमार यांनी दिला आहे !

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com