Bellbottom Release Date: अक्षयने टीजर शेअर करत जाहिर केली तारीख
Saam Banner Template

Bellbottom Release Date: अक्षयने टीजर शेअर करत जाहिर केली तारीख

महाराष्ट्रात अनलॉक प्रक्रिया सुरू होताच चित्रपट श्रुष्टीत रेलचेल सुरु झाली आहे. चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटांच्या प्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने अक्षय कुमारने (Akshay Kumar) अनलॉक (Unlock) होताच आपल्या बेलबॉटम चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. बेलबॉटमचा टीजर शेर करत अक्षयने लिहिले- मला माहित आहे की तुम्ही लोक बेलबॉटमची संयमाने वाट पाहत आहात. चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा करणे यापेक्षा जास्त समाधानकारक आणखी काय असू शकते.

येत्या 27 जुलै रोजी हा चित्रपट जगभरातील मोठ्या स्क्रीनवर प्रदर्शित होणार आहे. 2021 मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा अक्षयचा हा पहिला चित्रपट असेल. बेलबॉटम पूजा एंटरटेनमेंट निर्मित आणि रणजित तिवारी दिग्दर्शित आहे. (Bellbottom Release Date: Akshay shared a teaser and announced the date)

'बेलबॉटम' विषयी खास गोष्ट म्हणजे या चित्रपटाचे चित्रीकरण कोरोना विषाणू साथीच्या काळात झाले होते. आणि त्याचा टीझरही गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. स्टार्ट-टू-फिनिश शेड्यूलसाठी ओळखल्या जाणार्‍या अक्षय कुमारने स्कॉटलँडमध्ये बेलबॉटमचे चित्रीकरण केले आहे. या चित्रपटात वाणी कपूर फीमेल लीडमध्ये असून लारा दत्ता आणि हुमा कुरेशी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील. बेलबॉटमविषयी अक्षयच्या चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता आहे.

यापूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होऊ शकेल अशा बातम्याही आल्या होत्या पण अक्षयच्या घोषणेनंतर आता हे चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. बेलबॉटम प्रथम चित्रपटगृहांमध्ये येणार आहे. बेलबॉटमशिवाय अक्षयची सूर्यवंशी देखील रिलीजसाठी सज्ज झाली आहे. हा चित्रपट यावर्षी 30 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. याशिवाय पृथ्वीराज, रक्षाबंधन, अतरंगी रे, बच्चन पांडे आणि राम सेतु या प्रदर्शन होण्याच्या मार्गावर आहेत.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com