सावधान कोल्हापूर अजूनही डेंजर झोन मध्येच

 सावधान कोल्हापूर अजूनही डेंजर झोन मध्येच
Beware Kolhapur is still in danger zone

कोल्हापूर - राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध सैल करण्यासाठी पाच स्तरावर आखणी करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर अजूनही डेंजर झोनमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातला पॉझीटीव्हिटी रेट किती आहे? यावर ही आखणी करण्यात आली आहे. ज्या जिल्ह्यात पॉझीटीव्हिटी रेट कमी झाला आहे, त्या जिल्ह्यात पाच टप्प्यांची विभागणी करून निर्बंध कमी केले जाणार आहेत. Beware Kolhapur is still in danger zone

त्यासाठी स्थानिक प्रशासनाला अधिकार दिले आहेत. तसेच संबंधित जिल्हाधिकारी आणि महानगर प्रशासन याबाबतचा निर्णय जाहीर करणार  आहे. पॉझीटीव्हिटी रेटसोबतच जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या ऑक्सिजन बेडच्या संख्येवर पाच टप्पे ठरवण्यात आले आहेत. या आठवड्यातील उपलब्ध आकडेवारीनुसार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आपला टप्पा ठरवावा लागणार आहे.

हे देखील पहा - 

यात कोल्हापूरचा  पॉझीटीव्हिटी रेट सर्वाधिक 15.85 एवढा दर्शवण्यात आला आहे . कोल्हापूर पाठोपाठ रत्नागिरी - 14.2 , रायगड 13.3 आणि पुण्यात 11.11 पॉझीटीव्हिटी रेट दर्शवण्यात आला आहे. राज्य सरकारने निर्बंध उठवण्यासाठी लागू केलेल्या पाच स्तरीय आखणीची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यानुसार आजपासून पॉझीटीव्हिटी रेट कमी असलेल्या अनेक जिल्ह्यात निर्बंध अधिक शिथिल केले जाणार आहेत . 


कोणत्या जिल्ह्यात किती पॉझीटीव्हिटी रेट 

 मुंबई शहर आणि उपनगर – ४.४०  
अहमदनगर – २.६३
अकोला – ५.३७
अमरावती – ४.३६
औरंगाबाद – ५.३५
बीड – ५.२२
भंडारा – १.२२
बुलढाणा – २.३७
चंद्रपूर – ०.८७
धुळे – १.६
गडचिरोली – ५.५५
गोंदिया – ०.८३
हिंगोली – १.२०
जळगाव – १.८२
जालना – १.४४
लातूर – २.४३
नागपूर – ३.१३
नांदेड – १.१९
नंदुरबार – २.०६
नाशिक – ७.१२
उस्मानाबाद – ५.१६
पालघर – ४.४३
परभणी – २.३०
रत्नागिरी – १४.१२
सांगली – ६.८९
सातारा – ११.३०
सिंधुदुर्ग – ११.८९
सोलापूर – ३.४३
ठाणे – ५.९२
वर्धा – २.०५
वाशिम – २.२५
यवतमाळ – २.९१
 
पाच स्तरीय  किंवा टप्प्यांची आखणी कशा  प्रकारे- 

पहिला स्तर -  पॉझीटीव्हिटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी , तसेच जिल्ह्यात ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी भरलेले  असावेत .  


दुसरा स्तर - पॉझीटीव्हिटी रेट ५ टक्यांपेक्षा कमी , ऑक्सिजन बेड २५ ते ४० टक्क्यापेक्षा भरलेले . 


तिसरा स्तर -  पॉझीटीव्हिटी रेट ५ ते १० टक्यांपेक्षा कमी , तसेच ऑक्सिजन बेड ४० टक्यांपेक्षा जास्त  भरलेले . 


चौथा स्तर - पॉझीटीव्हिटी रेट १० ते २० टक्यांपेक्षा कमी , तसेच ऑक्सिजन बेड ६० टक्यांपेक्षा जास्त  भरलेले . 


पाचवा स्तर -  पॉझीटीव्हिटी रेट २० टक्यांपेक्षा जास्त , तसेच ऑक्सिजन बेड ७५  टक्यांपेक्षा जास्त  भरलेले .

Edited By - Puja Bonkile 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com