भंडाऱ्यात महिन्याभरानंतर कोरोनामुळे एकही मृत्यु नाही

भंडाऱ्यात महिन्याभरानंतर कोरोनामुळे एकही मृत्यु नाही
covid19.jpg

भंडारा : भंडारा Bhandara जिल्हाची आता कोरोना Corona मुक्तीकडे वाटचाल सुरु झालेली आहे. जिल्ह्याचा कोरोना बाधित रुग्णांचा रिकव्हर Recovery rate होण्याचा रेट आता हळूहळू वाढत चाललेला दिसून येत आहे. जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आनंदाची बाब म्हणजे रिकव्हरी रेट सध्या ९६.५३ टक्के झाला आहे. In Bhandara district no any death due to corona 

तब्बल महिन्याभरानंतर आज कोरोना मृत्यु संख्या निरंक आहे. हाती आलेल्या अहवालानुसार भंडारा जिल्ह्यात केवळ ९० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. महत्वाचे म्हणजे गेल्या २४ तासात एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यु झाला नाही. 

कोरोना आकडेवारी : 
जिल्ह्यात आता केवल ९८६ रुग्ण  एक्टीव्ह आहेत. जिल्ह्यात आत्ता पर्यंत ५८ हजार ८५५ कोरोना रुग्ण आढळून आले. तर ५६ हजार ८१५ रुग्ण कोरोना मुक्त होत घरी गेले आहेत. कोरोनामुळे जिल्ह्यात १०५४ लोकांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. जिल्हा प्रशासनाच्या नियोजन पूर्ण कामामुळे हा जिल्हा लवकरच कोरोना मुक्त होणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे.

हे देखील पहा - 

या साकारात्मक बातमीमुळे इतर लोकांच्या हि मनातील भीती कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे जिल्हा हळूहळू पूर्वरत होत आहे. 

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com