केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल मध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्यास परवानगी

Saam Banner Template (44).jpg
Saam Banner Template (44).jpg

इंदापूर - सतत साखरेच्या दरावरुन शेतकरी आणि कारखानदार याच्यातील वाद महाराष्ट्राला नवीन नाही. परंतु आता पेट्रोलमध्ये Petrol २० टक्के इथेनाॅल Ethanol मिसळण्याचा निर्णय झाल्याने आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर Suger उद्योगला चांगला दर  देता येणार आहे. त्यामुळे या देशातील शेतकऱ्यांना खुप मोठा दिलासा देण्याचे काम सरकारने central government केले आहे. केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय आहे. असे मत राज्याचे माजी सहकारमंत्री  आणी राज्य सहकारी साखर संघाचे सदस्य  हर्षवर्धन पाटील Harshvardhan Patil यांनी व्यक्त केले आहे. A big decision of the central government

देशातला पाच कोटी शेतकरी ही उस पिकवणारा शेतकरी आहे. त्यात महाराष्ट्रात चाळीस लाख शेतकरी उस पिकवतात. पन्नास ते साठ लाख कोटीची उलाढाल साखर उद्योगच्या माध्यमातून होते.

सध्या साखरेचा कोरोनाच्या काळात उठाव झाला नाही. साखर कारखान्याची  साखर गोदामात पडून आहे. त्यामुळे साखर कारखाने अडचणीत आले आहेत. इथेनाॅल मिश्रीतच्या या निर्णयामुळेे साखर कारखान्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. 

उस हा देशातील नगदी आणी रोख पैसे दोणारे पिक आहे, देशात 320 लाख मेट्रिक टन साखर उत्पादित होते, तर देशांतर्गत साखरेची मागणी 250 लाख मेट्रिक टन आहे. भारतात  युरोपच्या तुलनेत दरडोई साखरेचा वापर कमी आहे. सध्या देशांतर्गत 35 टक्के साखर घरगुती आणि 65 टक्के    साखरचा  औद्योगिक वापरासाठी उपयोग होत आहे. तुलनेत म्हणजे 8 लाख मेट्रिक टन अतिरक्त साखर गोदामात पडून राहते. शेतकऱ्यांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आता मात्र या निर्णयामुळे शेतकऱ्यांना चांगला दर देता येणार आहे.  A big decision of the central government

2018 मध्ये केंद्र सरकारने जैव इंधनाविषयी राष्ट्रीय धोरण अमलात आणले आणि त्यानुसार पेट्रोल, डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे बंधन घातले आहे. देशातील तिन्ही सार्वजनिक इंधन कंपन्यांचे 186 ऑईल डेपो oil depot आणि 179 शुद्धीकरण प्रकल्पांमध्ये इथेनॉल ethanol मिसळण्याची प्रक्रिया करण्यात येते. 2012 मध्ये ५ टक्के, 2017 मध्ये 10 टक्के मिश्रण तेलात टाकण्यासंदर्भात सुधारणा कायद्यात करण्यात आले. तर,2019 मध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी पेट्रोल आणि डीझेलमध्ये जैव इंधन मिसळणे सक्तीचे करण्यात आले होते.

हे देखील पहा -

पेट्रोल मध्ये वीस टक्के इथेनाॅल मिसळण्यास परवानगी दिल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.  तर साखर कारखानदारांनाही त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे.  हा कृषी क्षेत्रातील सर्वात मोठा क्रांतीकारी निर्णयअसल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगीतले. 

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com