गुळाच्या दरात मोठी वाढ.... 

गुळाच्या दरात मोठी वाढ.... 
Big increase in jaggery prices

पुणे : कोरोनामुळे Corona काढे करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात, गुळाचा Jaggery वापर केला जात असल्यानं गुळाला "अच्छे दिन" आले आहेत. याशिवाय एप्रिल अखेर बहुतांश ठिकाणची गुऱ्हाळ बंद झाल्यानं उत्पादनात मोठी घट झाली आहे. Big increase in jaggery prices 

उत्पादनात घट आणि मागणीत प्रचंड वाढ झाल्याने गुळाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आयुर्वेदिक Ayurvedic काढे करून पिण्याचे प्रमाणही वाढले आहे. दरवाढीची ही परिस्थिती अजून सात महिने अशीच राहणार असल्याचं चित्र आहे.

गेल्या काही वर्षांपासून पुण्यासह Pune महाराष्ट्रात Maharashtra सेंद्रिय गुळाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. सेंद्रिय गूळ रसायन विरहित आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक Karnataka, आंध्र प्रदेशात गुळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. महाराष्ट्रातील कोल्हापूर भागातील गुळाची प्रतवारी उत्तम मानली जाते. Big increase in jaggery prices

हे देखील पहा 

जवाहरलाल बोथरा - गुळाचे व्यापारी, पुणे पेठ
गुळाचे दर Rates ( घाऊक बाजार )

- एक किलोचे दर ३२ रुपये ते ३६ रुपये आहे.

- दहा किलोची ढेप ३००० रुपये ते ३२००

- बॉक्स पॅकिंगचे (वीस किलो) ३६०० ते ४५०० रुपये

- सेंद्रिय गुळाचे एक किलोचा दर ४२ ते ४८ रुपये

गुळाचे दर ( किरकोळ बाजार )

- एक किलोचे दर ६० रुपये ते ७० रुपये

- दहा किलोची ढेप ४५०० रुपये ते ६०००

- बॉक्स पॅकिंगचे (वीस किलो) ६५०० ते ७००० रुपये

- सेंद्रिय गुळाचे एक किलोचा दर ७० ते ७५ रुपये 

Edited By- Digambar Jadhav
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com