दोन्ही पक्षातील नेत्यामधे मतभेद 

दोन्ही पक्षातील नेत्यामधे मतभेद 

मुंबई : भाजप-शिवसेना युतीची घोषणा झालेली असली तरी दोन्ही पक्षातील बंडोबांच्या रुद्रावताराने युतीवर मैत्रीपुर्ण लढतीचे सावट ओढावण्याची शक्यता आहे. जे मतदारसंघ भाजपला सुटले तिथे शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर जे मतदारसंघ शिवसेनेला सुटले तिथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी टोकाची भूमिका घेतली आहे. यामुळे बहुतांश मतदारसंघात बंडखोरांनी उमेदवारी दाखल करण्याचा निर्धार केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दमछाक सुरू झाली आहे. 

दरम्यान, युतीमधल्या बंडखोरांच्या धास्तीने भाजप व शिवसेनेनं सर्वच्या सर्व मतदारसंघात एबी फाॅर्मचे पोहचवले असून ऐनवेळी कोणतीही गडबड नको यासाठीची पुर्वतयारी केली आहे. 

या सर्व परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी युतीमधे काही जागांवर मैत्रीपुर्ण लढती करण्याची नवी खेळी समोर आणली असून दोन्ही पक्षातील नेत्यामधे यावर मतभेद सुरू झाले आहेत. 

शिवसेनेनं युती करताना पुर्णपणे भाजपच्या शब्दावर विश्वास ठेवला. पण अनेक मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. तर शिवसैनिकांनी देखील नाशिक, पुणे व नागपूर सारख्या शहरात बंड करण्याची तयारी सुरू केली आहे. या सर्व परिस्थितीमधे काॅग्रेस व राष्ट्रवादीने या बंडखोरांना बगल देत उमेदवारी यादी जाहिर केल्यामुळे युतीच्या ईच्छुकांमधे कमालीचा संताप सुरू असल्याचे चित्र आहे. 

भाजपने सर्वच्या सर्व 288 मतदारसंघात एबी फाॅर्म पाठवले याची माहिती मिळताच शिवसेने देखील सर्व मतदार संघात एबी फाॅर्म रवाना केले आहेत.

Web Title: BJP and Shivsena may be contest friendly in Maharashtra Vidhan Sabha 2019
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com