शिवसेनेच्या  भुमिकेमुळे भाजप हतबल

शिवसेनेच्या भुमिकेमुळे भाजप हतबल

मुंबई  :   भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला नाही. यानंतर सरकार स्थापन करण्याबाबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घ्यावा,अशी अप्रत्यक्ष कबुली दिली आहे. शिवसेनेच्या या भुमिकेमुळे भाजपाचे राज्य नेतृत्व हतबल झाले आहे.

चौदा  दिवस उलटून गेले तरीही राज्यात सत्ता स्थापनेचा दावा कोणत्याही पक्षाकडून झालेला नाही.भाजप-शिवसेना युतीने लढून बहुमत प्राप्त केले तरीही त्यांच्यात सत्ता वाट्यावरून मतभेद आहेत .  आज भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन कायदेशीर बाबीवर सल्लामसलत  केली.

भाजप-शिवसेना युतीने लढले असून भाजपला 105 तर शिवसेनेला 56 असे 161  स्पष्ट बहुमत मिळाले आहे.मात्र ठरल्याप्रमाणे भाजपने शिवसेनेला सत्तेत वाटा दिला जात नाही यावरून  यूतीत मतभेद आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,जलसःपदा मंत्री गिरीश महाजन आदींनी  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

मात्र सत्ता स्थापनेचा दावा केला नाही.यानंतर माध्यमाशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की राज्यातील जनतेने महायुतीला जनादेश दिला आहे.त्यामुळे राज्यातील जनतेची महायुतीचे सरकार व्हावे ही इच्छाआहे.याबाबत राज्यपालांशी सविस्तर चर्चा करण्यासाठी भेट घेतली.त्यांना राजकीय परिस्थितीबाबत कल्पना दिली.


WebTittle:: BJP is frustrated by the role of Shiv Sena

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com