काॅग्रेसमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी 

काॅग्रेसमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी 

मुंबई : काॉग्रेसने 51 उमेदवारांची यादी जाहिर करताना शिवसेना -भाजपमधील ईच्छूक बंडखोरांना बगल देत पक्षातील नव्या चेहर्यांना संधी दिली आहे. यामध्ये विद्यमान आमदार व माजी आमदारांना पुन्हा उमेदवारी देताना बहुतांश मतदारसंघात पक्षातील नव्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे.

पत्रकार युवराज मोहिते यांना गोरेगाव मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली असून, इतर 50 जागांवर काॅग्रेसने एकाही इतर पक्षातील उमेदवाराला संधी दिली नाही. 

दरम्यान, भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर दोन्ही पक्षातील अनेक बंडखोरांनी काॅग्रेसच्या उमेदवारीसाठी संपर्क साधला होता. मात्र काॅग्रेसने त्यांना डावलून पक्षातील नव्या निष्ठावंत चेहर्यांना संधी दिली आहे.


Web Title: BJP rebels have no chance in Congress party
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com