भाजपकडून गोवा विधानसभा निवडणुकीच्या कवायती सुरू 

Bjp Goa
Bjp Goa

पणजी : आठ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गोवा विधानसभेच्या निवडणुकांसाठी भाजपने BJP आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यासाठीच वरिष्ठ नेत्यांबरोबर आमदार, मंत्री आणि कोअर टीम ची बैठक घेऊन विविध प्रकारच्या शक्यतांवर चर्चा सुरु केली आहे. BJP Starts Drills For Goa Assembly Elections

गोवा Goa विधानसभेच्या Assembly 2022 मध्ये होणाऱ्या निवडणूकीसाठी Election पक्षाचे सचिव बी.एल संतोष, गोवा प्रभारी सि.टी रवी यांच्यासोबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी बैठकांचे सत्र सुरू केले असून विविध प्रकारच्या शक्यतांवर विचारविमर्श सुरू आहे.

या बैठकीमध्ये  महिला मोर्चा, खासदार, माजी आमदार, यांनाही सामावून घेतले आहे. विधानसभेच्या निवडणुका फेब्रुवारी 2022 होत असून सध्या भाजपकडे 27 आमदार MLA आहेत याशिवाय अपक्ष आमदार गोविंद गावडे यांनीही भाजपबरोबर जाण्यास संमती दर्शवली आहे.

हे देखील पहा -

याशिवाय अन्य पक्षातील आमदार फोडून ते भाजपमध्ये आणण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे. गोव्यातील कोविडची Covid साथ आटोक्यात आल्यास विधानसभा विसर्जित करून निवडणुका घेण्याचा भाजपचा विचार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे.

त्यामुळे फोडाफोडी ही होईल असा अंदाजही व्यक्त केला जातोय. मात्र भाजप निवडणुकांसाठी तयार आहे, हे सांगताना पक्ष राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देतो हे सांगितलं जात आहे.

मुख्यमंत्री CM  Pramod Sawant मात्र या बैठका नेहमीच्या स्वरूपाच्या असून यामध्ये निवडणुकांच्या संबंधित चर्चा होत आहे. असे सांगत आहेत. कोरोनाच्या Corona साथीमुळे राज्याचे आरोग्य बिघडेल असून आर्थिक परिस्थिती ही चांगली नाही. रोजगार कमी होऊन बेरोजगारी वाढलेली आहे त्यामुळे सरकार विरोधात असंतोष वाढल्याचे काही आमदारांनी वरिष्ठ नेत्यांकडे कळविले आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com