बार्शीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना दाखवले काळे झेंडे

बार्शीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना दाखवले काळे झेंडे
bharne

सोलापूर - जिल्ह्यातील बार्शीमध्ये Barshi दिवसेंदिवस कोरोनाबाधित Corona आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान सोलापूर Solapur जिल्ह्यातील आचार संहिता शिथिल झाल्यानंतर पालकमंत्री Guardian Minister दत्तात्रय भरणे  Dattatraya Bharne हे आज कोविडचा आढावा घेण्यासाठी बार्शी दौऱ्यावर आहेत. यावेळी पालकमंत्र्यांच्या ताफ्यासमोर कांही सामाजिक कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवले.  Black flags shown to Guardian Minister Dattatraya Bharne in Barshi

बार्शीत रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा,ऑक्सिजनचा तुटवडा हा मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यात पालकमंत्री दोन  महिन्यानंतर बार्शीला आल्याने संतप्त सामाजिक कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले आहेत. पोलिसांनी काळे झेंडे दाखवणाऱ्या बालाजी डोईफोडे आणि अप्पासाहेब पवार यांना ताब्यात घेतलं आहे.

Edited By - Shivani Tichkule

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com