खळबळजनक रेमडीसिविरचा सर्रास काळाबाजार; रेमडीसिविरमध्ये सलाईनचे पाणी टाकून विक्री.....!

खळबळजनक रेमडीसिविरचा सर्रास काळाबाजार; रेमडीसिविरमध्ये सलाईनचे पाणी टाकून विक्री.....!
new rule for vaccination

बीड : एकीकडे राज्यात रेमडीसिविर Remedesivir इंजेक्शनचा तुटवडा  निर्माण झाला आहे तर दुसरीकडे रेमडीसिविर इंजेक्शनचा सर्रास काळाबाजार Black Market सुरू असल्याचं समोर आलं आहे, असे असताना तुम्ही घेतलेलं इंजेक्शन हे ओरिजनल आहे का ? हे नक्की तपासून पहा, कारण बीडमध्ये रेमडीसिविर इंजेक्शनच्या नावाखाली एका व्यक्तीला बनावट इंजेक्शन देण्यात आलं आहे. याच दरम्यान शिवाजीनगर पोलिसांनी Police दोघा जणांना रंगेहात पकडल आहे. Black market of remedisivir injection in Beed

तपासा अंती धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे यातील एक आरोपी कंपाउंडर Compounder असून त्याने रुग्णालयातील इंजेक्शनच्या बाटल्यात सलाईनचे पाणी टाकून हे इंजेक्शन २२ हजारांना विकण्याचा प्रयत्न केला. काळ्याबाजारात एका इंजेक्शनची किंमत जवळपास ३० ते ४० हजार रुपयांपर्यंत आहे. माञ, हे इंजेक्शन मिळवण्यासाठी देखील रुग्णांच्या नातेवाईकांना मोठे प्रयत्न करावे लागत आहे.

एकीकडे जिल्हा प्रशासनाकडून Administration रेमडीसिविरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना नोंदणी करण्याचे आवाहन केलं जातं आहे. परंतु नोंदणी केल्यानंतर जवळपास ६ दिवसानंतर देखील इंजेक्शन हाती मिळत नाही. त्यामुळेच काळाबाजारातून इंजेक्शन विकत घेण्याची वेळ नातेवाईकांवर येत आहे. परंतु या प्रकारानंतर काळ्या बाजारातील इंजेक्शन देखील ओरिजनल मिळण्याची शाश्वती राहिली नाही. असे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे म्हणाले आहेत. Black market of remedisivir injection in Beed

याविषयीचा तक्रार माजी आमदार भीमसेन धोंडे Bhimsen Dhonde यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यात येणाऱ्या रेमडेसीवीर इंजेक्शनचं वाटप कसं झालं? याची माहिती स्थानिक पेपरच्या माध्यमातून द्यावी. आज काळाबाजार मोठ्या प्रमाणात होत आहे. २५ हजार रुपये दिल की इंजेक्शन मिळत आहे. आज खाजगी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णांच्या नातेवाइकांच शोषण सुरु आहे. ते तात्काळ थांबलं पाहिजे. जे काळाबाजार करत आहेत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा.अशी मागणी भीमसेन धोंडे यांनी केली आहे.

भाजपा BJP नेत्या पंकजा मुंडे Pankaja Munde यांनी देखील रेमडीसिविर इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याचं वास्तव मांडल आहे. आणि याच अनुषंगाने पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांना पत्र पाठवले, या पत्रात बीडमध्ये Beed रेमडीसीवीर इंजेक्शन विशिष्ट पक्षाचे नेते कार्यकर्ते स्वतःच्या कार्यालयातून करत असल्याचा आरोप मुंडेंनी केला होता. Black market of remedisivir injection in Beed

दरम्यान, बीड जिल्ह्यात रेमडिसिव्हर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार समोर येत आहे. एकीकडे रुग्णांचे नातेवाईक रेमडेसीवीरसाठी वणवण करत आहेत. तर दुसरीकडे रेमडेसीवीर इंजेक्शनच्या काळा बाजार जोरात सुरू आहे. यामुळे शासनाने यावर ठोस कारवाई करावी. अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com