कोरोनामुळे मृत झालेल्या पत्नीचा मृतदेह पतीने रुग्णालयातून परस्पर पळवला...

कोरोनामुळे मृत झालेल्या पत्नीचा मृतदेह पतीने रुग्णालयातून परस्पर पळवला...
hospital news

बीड - कोरोनामुळे Corona मृत झालेल्या पत्नीचा मृतदेह पतीने रुग्णालयातून Hospital परस्पर पळवल्याचा धक्कादायक प्रकार बीड Beed जिल्हा रुग्णालयात उघडकीस आला आहे. या प्रकरणी डॉक्टर Doctor आणि नर्सच्या Nurseतक्रारी वरून, पती व नातेवाईकांविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात Police Satation गुन्हा दाखल करण्यात आला आहे. The body of the wife who died due to corona was snatched from the hospital by husband 

अशापद्धतीने मृतदेह Death bodyपळवून नेत असतानाची बीड जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. गेवराई तालुक्यातील कुंभार वाडी Kumbhar Wadi येथील सुरवसे कुटुंबातील कोरोना पॉझिटिव्ह महिला गेल्या पाच दिवसा पासून जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होती. या महिलेचा आज पहाटे पाच वाजता मृत्यू झाला होता.

हे देखील पहा -

मृत्यू नंतर डॉक्टर व नर्स यांची नजर चुकवून पती रुस्तुम सुरवसे यांनी व नातेवाईकांनी मयत पत्नीचा मृतदेह गाडीत टाकून पळवून नेला.अशी तक्रार नर्स अर्चना रामेश्वर पिंगळे यांनी दिली आहे. या फिर्यादीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.डॉक्टरांनी आणि नर्सने मृतदेह अंत्यविधीसाठी देता येणार नाही. असे सांगितले असताना देखील, कुठलीही काळजी न घेता वैद्यकीय तपासणी न करता,नातेवाईक बॉडी ताब्यात घेऊन गावाकडे घेऊन गेले.असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. The body of the wife who died due to corona was snatched from the hospital by husband 

विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक किंवा आरएमओ कोणीही रुग्णालयात फिरकले नाही.यामुळं आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना देखील यांचं गांभीर्य नसल्याचं समोर आलं आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com