प्रवासाचे बोगस ई-पास बनवणाऱ्यांचा पर्दाफाश; पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या

osmanabad
osmanabad

उस्मानाबाद : कोरोनाला Corona अटकाव घालण्यासाठी शासन आटोकाट प्रयत्न करत आहे. कडक निर्बंध आणि लॉकडाऊनच्या Lockdown माध्यमातून वाहतुकीवर नियंत्रण ठेवून कोरोना संसर्ग रोखण्याचे उपाय सुरु आहेत. मात्र काही जण या परिस्थितीचा फायदा घेत आहेत. Bogus E-Pass Makers Exposed

बोगस Bogus ई-पास E-Pass बनवणाऱ्या तिघांना उस्मानाबाद Osmanabad पोलीस Police अधीक्षक कार्यालयातील सायबर सेल Cyber Cell आणि कळंब पोलिसांनी संयुक्त कारवाई करून ताब्यात घेतले आहे. हि साखळी जिल्हाभर बोगस ई-पास बनवून देत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हे देखील पहा -

जिल्ह्यात मागील कांही दिवसांपासून प्रवासाचे बोगस ई-पास तयार करून नागरिकांची फसवणूक होत असल्याची चर्चा सुरु होती. त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करून सदर गुन्हा उघडकीस आणला आहे. एक पास बनवण्यासाठी जवळपास 1200 रुपये या टोळीकडून घेतले जात आहेत. Bogus E-Pass Makers Exposed

विजय सिरसाठे,महादेव राजगुरू आणि श्रीकांत कवडे या तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. बोगस ई-पास चे राज्यभर धागेदोरे असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. 

Edited By : Krushnarav Sathe
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com