बॉलिवूड क्वीन कंगना रनौत कोरोना पॉझिटिव्ह

बॉलिवूड क्वीन कंगना रनौत कोरोना पॉझिटिव्ह
kangana covid

नवी दिल्ली: कोरोना Corona व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातले आहे. रोज लाखो लोकांना कोरोनाचं संक्रमण होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहेत. सामान्य जनतेसोबतच कोरोनाने बॉलिवूड Bollywood ला देखील सोडलेले नाही. अनेक बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटींनाही गेल्या काही महिन्यात कोरोनाचा संसर्ग झाला आहे .Bollywood Actress Kangana Ranaut tested Positive for Corona

हे देखील पहा -

आता अभिनेत्री कंगना रनौत ही या कोरोना संसर्गाची बळी ठरली आहे. इन्स्टाग्रामवर कंगनाने ती कोरोना पॉसिटीव्ह असल्याची माहिती दिली. कांगानेने  हिमाचल प्रदेशात Himachal Pradesh तपासणी केली होती. तिथे जाऊन तिने कोरोना चाचणी केली असता तिचा अहवाल  पॉझिटिव्ह आल्याचे तिने सांगितले आहे. 

कंगना राणौतने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "गेल्या काही दिवसांपासून माझ्या डोळ्यांतील जळजळपणामुळे मला थकवा आणि अशक्तपणा जाणवत होता, मी हिमाचलला जाणार होती म्हणूनच काल मी माझी कोरोना चाचणी करून घेतली.  आणि आज माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आहे आला आहे.

तथापि, अभिनेत्रीने याची खात्री दिली की ती योद्धाप्रमाणे संक्रमणाशी लढेल. ती पुढे म्हणाली, "मी स्वत: ला विलगीकरणात ठेवले आहे, मला माहित नव्हते की हा विषाणू माझ्या शरीरात पार्टी करीत आहे, पण आता मला माहित आहे की मी याचा नाश करीन, कृपया  कोणतीही शक्ती तुमच्यावर हावी होऊ देऊ नका, जर तुम्हाला भीती वाटली तर ते तुम्हाला आणखी घाबरवेल, चला या कोविडचा नाश करूया. कोरोना हा एवढा काही नाही एक छोटासा फ्लू आहे. ज्याला जास्त भाव मिळाला आहे. हर हर महादेव"

Edited By- Sanika Gade

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com