'बॉश' कंपनी उत्पादन बंद ठेवणार 

'बॉश' कंपनी उत्पादन बंद ठेवणार 

नाशिक : बॉश या आघाडीच्या कंपनीने पाच दिवस उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडूमध्ये असलेल्या कारखान्यातील उत्पादन पाच दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.

वाहनांची विक्री मंदावल्याने आता वाहनांचे  सुटे बनवणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादनांना देखील मागणी कमी झाली आहे. बॉश कंपनीकडून वाहनांचे सुटे भाग बनवले जातात.

केंद्र सरकारने वाहन उद्योगासाठी घोषणा करून देखील मंदीचे वारे थांबलेले नाही. घटती मागणी आणि वितरकांकडे पडून राहिलेल्या वाहनांमुळे कंपन्यांना उतपादन थांबवावे लागले आहे.

मुंबई शेअर बाजारात बॉश कंपनीचा शेअर 13,675 रुपयांवर व्यवहार करत होता.  त्यात 568.25 रुपयांची म्हणजेच 3.99 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. याबरोबरच इतर वाहन कंपन्यांच्या शेअरमध्ये देखील   घसरण नोंदवण्यात आली.


Web Title: Bosch company shutdown production on 5 days recession effect

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com