साताऱ्यात जम्बो कोव्हिड सेंटर बाहेर प्रशासनाकडुन चक्क बाऊन्सरची नियुक्ती...

साताऱ्यात जम्बो कोव्हिड सेंटर बाहेर प्रशासनाकडुन चक्क बाऊन्सरची नियुक्ती...
bouncer

सातारा - आज पर्यंत आपण बार Bar ,हॉटेल Hotel ,पब Pub आशा ठिकाणी बाऊनसर Bouncer बघितले असतील पण साताऱ्यात  Satara एक अजब प्रकार पाहायला मिळत आहे. चक्क शासनाने सुरू केलेल्या जम्बो कोव्हिड सेंटर Covid Hospital बाहेरच बाऊन्सरच एक टोळकं तैनात करण्यात आलं आहे. bouncer appointed by administration outside Jumbo Covid Center in Satara

कोव्हिड सेंटरला लोक हौस म्हणून किंवा फिरायला म्हणून येत नसतात तर रुग्णांना इलाज मिळावा म्हणून रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक येत असतात आशा परिस्थिती मध्ये बाऊन्सर कोणाला भीती घालायला नेमल आहे असा प्रश्न सातारकर आता विचारू लागले आहेत.

हे देखील पहा -

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन मागील वर्षी जिल्हा प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या या नव्या इमारतीत जिल्हा कोव्हिड जम्बो रुग्णालयाची निर्मिती केली हे कोविड रुग्णालय विविध कारणातून सध्या चर्चेत येत आहे. याठिकाणी आजपासु‌न प्रशासनाने कायदा व्यवस्था बिघडु नये. bouncer appointed by administration outside Jumbo Covid Center in Satara

यासाठी बाऊन्सरची नियुक्ती केली आहे. रात्र आणि दिवस 14 बाऊन्सर जम्बो रुग्णालय परिसरात तैनात करण्यात आले आहेत. वास्तविक पाहायला गेलं तर जिल्ह्यात सध्या लाॅकडाऊन असल्यामुळे रुग्णांचे मोजकेच नातेवाईक या कोव्हिड  जम्बो रुग्णालयात येत आहेत मात्र बाऊन्सरची नियुक्ती केल्यामुळे त्यांना आता गेटवरच थांबायची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत सामाजिक संस्थांनी विरोध दर्शविला आहे. रुग्णालय बाहेरील बाऊन्सर हटवा अन्यथा तिव्र आंदोलन करुन असा इशारा त्यांनी दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com