दोरीवरची कसरत करणारा धाडसी अवलिया

दोरीवरची कसरत करणारा धाडसी अवलिया
Saam Banner Template (39).jpg

पुणे - भटकंती करत पोटाची खळगी भरण्यासाठी दोरी वर चालणारे डोंबारी जमात Dombari tribe आपण नेहमी पाहतो. पण दोन उंच डोंगरावर जाऊन मध्यभागी दोरी बांधायची, खाली खोल दरी, कोणताही आधार न घेता दोरी वरून चालण्याचे धाडस करण्याचा खेळ करणारा तरूण पाहिला नवलच वाटण्यासारखे आहे. A brave Avaliya exercising on a rope

शिरूर Shirur तालुक्यातील मलठण येथील राजघराण्यातील 12 वे युवराज हर्षदिप उदयसिंह राजे पवार हे धाडस करत आहेत. त्यांनी आत्ता पर्यंत देशात आठ राज्यात हा धाडसी खेळ खेळला आहे. कोणताही आधार न घेता न पडता हे साहस 155 मीटर पर्यंत पार करत देशात रेकॉर्ड तयार केले आहे.  

मलठण ( ता. शिरूर ) येथील पवाराच्या वाड्याला यशवंतराव पवार यांच्या पानीपतच्या लढाईच्या राजघराण्यापासूनच वारसा आहे. येथील धैर्यशिल राजे पवार यांनी पोलो आणी पोहण्या मध्ये तर फत्तेसिंह राजे पवार यांनी देखील क्रिकेट मध्ये नाव लौकीक मिळवला होता. वयाच्या सतराव्या वर्षापासून हर्षदिप उदयसिंह राजे पवार यांनी खोलदरी मध्ये दोरीवरून चालणे ( हाय लायनर ) मध्ये धाडस करण्याचे ठरविले. A brave Avaliya exercising on a rope

त्यामध्ये त्यांनी यश देखील मिळविले आहे. अगदी दोन झाडांमध्ये दोरी बांधून त्यांनी हे स्वतःच प्रशिक्षण घेतले. लहानपणा पासून धडपड करण्याची वृत्ती व लढाऊ राजघराण्याचा वारसा यामुळे त्यांनी धाडस केलेले पहावयास मिळते. येथील पवाराच्या राजवाड्यात देखील त्यांनी दोन टोकाला दोरी बांधून चालण्याचे धाडसी खेळ केला होता. देशात गोवा, कर्नाटक, केरळ, जम्मू काश्मीर, लदाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या ठिकाणी हा साहसी खेळ केला आहे. नुकताच गोवा मध्ये कोणताही आधार न घेता, न पडता, 8 मिनीटात 150 फूट उंचीवर दोरी बांधून त्यावरून चालत 155 मीटर अंतर पार केले. या धाडसी खेळाचे परदेशात प्रशिक्षण मिळते. 

मात्र भारतात याचे प्रशिक्षण नाही. 3 किलोमिटर दोरीवरून चालण्याचे आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड असून या खेळामुळे तांत्रिक बाबीला अधिक महत्व दिले जाते. दोरीवरून पडू नये यासाठी एक विशेष दोरी कंबरेला बांधलेली असते. त्यामुळे दोरीवरून निसटला तरी चार फुटापेक्षा खाली पडत नाही. दोरी लावण्यासाठी टिम वर्क असावे लागते. त्याशिवाय दोन ते चार दिवस मुक्काम करून परीसरात रहावे लागते. A brave Avaliya exercising on a rope

हे देखील पहा -

मनाची एकाग्रता व आत्मबल निर्माण करण्यासाठी हा धाडसी खेळ अतिशय महत्वाचा ठरतो. हा धाडसी खेळ खेळताना जबाबदारी व यातील तांत्रीक बाबींना अधिक महत्व दिले जाते. भविष्यात एक हजार मिटर अंतर पार करण्याचे धाडस लवकरच करणार आहे. पुर्ण प्रशिक्षण घेऊनच असा धाडसी खेळ खेळणे गरजेचे आहे. राज घराण्यामुळे रक्तातच धडासी वृत्ती असल्याने हे धाडस करत आहे. 

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com