BREAKING | अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरूच

BREAKING | अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरूच

मुसळधार पावसामुळे मुंबईसह उपनगरातील विविध भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. उपनगरातील कांदिवली, मलाड, बोरीवली भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच, चेंबूरच्या पोस्टल कॉलनी विभागात रात्रभर झालेल्या पावसाने गुडघाभर पाणी साचले आहे. या कॉलनीमधील रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. या कॉलनीमधील काही घरात देखील पाणी भरले आहे. तर मुंबईतील हिंद माता, दादर, सायन आणि किंग्ज सर्कल या भागातही पाणी साचले आहे.

दरम्यान, आज पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार, येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
 

मुंबई शहर, उपनगरासह ठाणे परिसरात रविवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. विशेषत: मुंबई शहरासह उपनगरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. आजही मुंबईमध्ये हायअलर्ट देण्यात आलेला आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरातही सकाळपासूनच पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे.आज पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार, येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल.

WebTittle :: BREAKING | Heavy rains continue in many places

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com