Breaking ; यंदाही पायी वारी नाहीच !

Breaking ; यंदाही पायी वारी नाहीच !
wari

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही पायी आषाढी Ashadhi वारी Wari निघणार नाही, असे उपमुख्यमंत्री Deputy CM अजित पवार Ajit Pawar यांनी आज स्पष्ट केले. मात्र दहा मानाच्या पालखी सोहळ्यांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थितीची अट काही प्रमाणात शिथिल करण्यात आली आहे, असे पवार यांनी सांगितले. Breaking State Government Decision Regarding To Ashadhi Wari 

आज झालेल्या कोरोना आढावा बैठकीत वारीबाबत चर्चा झाली. त्याबाबत पवार यांनी माहिती दिली. ''काल मंत्रीमंडळाची बैठक झाली त्यात दहा महत्त्वाच्या पालख्यांना परवानगी देण्यासंदर्भात चर्चा झाली.

दहा मानाच्या पालख्या क्रम -

०१) संत निवृत्ती महाराज ( त्रंबकेश्वर )

०२) संत ज्ञानेश्वर महाराज ( आळंदी )

०३) संत सोपान काका महाराज ( सासवड )

०४) संत मुक्ताबाई ( मुक्ताईनगर )

०५) संत तुकाराम महाराज ( देहू )

०६) संत नामदेव महाराज ( पंढरपूर )

०७) संत एकनाथ महाराज ( पैठण )

०८) रुक्मिणी माता ( कौडानेपूर -अमरावती )

०९) संत निळोबाराय ( पिंपळनेर - पारनेर अहमदनगर )

१०) संत चांगटेश्वर महाराज ( सासवड )

यावेळी Dehu देहु व आळंदी Alandi प्रस्थान सोहळ्यासाठी १०० लोकांना व उरलेल्या आठ पालख्यांमध्ये ५० जणांना सहभागी होता येईल. सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी वैद्यकीय चाचणी बंधनकारक असणार आहे. अशी माहिती देखील उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

यावेळी देखील गतवर्षीप्रमाणेच वारकरी पालखी Palakhi घेऊन चालत जाणार नाहीत. यावेळी पालख्यांना प्रत्येकी दोन बसेस दिल्या जाणार आहेत. त्यातून पालख्या पंढरपूरकडे Pandharpur नेल्या जातील.

प्रत्येक बसमध्ये Bus कोरोना अटींचे पालन करुन प्रत्येकी ३० जणांना परवानगी असेल,'' असे अजित पवार यांनी सांगितले. पालख्या वाखरीला Wakhari पोहोचल्यानंतर पंढरपूरपर्यंत प्रातिनिधीक स्वरुपात पायी वारी काढता येईल. रिंगण आणि रथोत्सवाच्या सोहळ्यास १५ जणांनाच परवानगी राहणार आहे. असेही पवार यांनी सांगितले. 

हे देखील पहा -

वारकरी सांप्रदाय नियमाप्रमाणे वागला तरी भाविक उत्साहाने बाहेर येणार. वारी मार्गावरच्या गावांतील सरपंचांनीही सांगितले की यावर्षी परवानगी देऊ नका. लोकांचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे, त्यामुळे नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला आहे, असे पवार यांनी सांगितले.

तसेच सर्व भाविकांनी व वारकऱ्यांनी कोरोना संकटाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन सहकार्य करावे व कोरोना Corona नियमांचे पालन करून पालखी सोहळा साजरा करण्यात यावा असे आवाहन पवार यांनी यावेळी केले आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com