संचारबंदीचे उल्लंघन केलेल्या दुकानावर बुलडाणा नगर पालिकेने ठोठावला दंड

संचारबंदीचे उल्लंघन केलेल्या दुकानावर बुलडाणा नगर पालिकेने ठोठावला दंड
karvai

बुलडाणा: लॉकडाऊन काळात संचारबंदीचे नियम झुगारून कापड दुकान उघडले आणि दुकानात ग्राहकांची गर्दी जमविणार्‍या बुलढाणा येथील अमर कलेक्शन Amar Collection कापड दुकानावर नगर पालीकाच्या पथकाने तब्बल 35 हजार रुपयांचा दंड ठोठवला आहे. या कारवाईमुळे मात्र इतर कापड व्यवसायीकांचे धाबे दणाणले आहे. Buldhana Municipality fines shop for violating curfew rules 

बुलडाणा जिल्ह्यात वाढत्या कोरोना Corona संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केलेले आहे. तसेच जीवनावश्यक वस्तू तथा दूध विक्री व शेती उपयोगी दुकानांना मर्यादित वेळेत उघडे ठेवण्याचे आदेश आहे. असे असतानाही काही व्यवसायिक परवानगी नसताना आपले प्रतिष्ठान उघडत आहे. 

हे देखील पहा -

अशा दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नगरपालिकेने Municipality पथक नेमले आहे. हे पथक संपूर्ण शहरात फिरत असते. बुलडाणा शहरातील आठवडी बाजार परिसरातील अमर कलेक्शन ही दुकान उघडे असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. दरम्यान हे पथक अमर कलेक्शन वर धडकले असता, यावेळी दुकानात 30 ते 35 ग्राहक आढळून आले. Buldhana Municipality fines shop for violating curfew rules 

सर्व ग्राहकांना बाहेर काढून अमर कलेक्शनवर नगरपालिकाच्या या पथकाने दंडात्मक कारवाई करत 35 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. आतापर्यंतची ही बुलडाणा शहरातील सर्वात मोठी दंडात्मक कारवाई ठरली आहे. 

कोरोना नियमांचे पालन काटेकोरपणे करण्याचे आवाहन नगर पालीका प्रशासनाने केले आहे. अन्यथा कड़क कारवाईला सामोरे जावे लागेल असे बजावून सांगण्यात आले आहे. 

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com