नांदेड जिल्ह्यात लसीकरणाचा बोजवारा; अपुऱ्या लसीमुळे प्रशासनाचे नियोजन कोलमडले

नांदेड जिल्ह्यात लसीकरणाचा बोजवारा; अपुऱ्या लसीमुळे प्रशासनाचे नियोजन कोलमडले
nanded vaccine

नांदेड - राज्यात कोव्हीशिल्ड Covishelid आणि कोव्हॅक्सिन Covaccine या दोन्ही लसींचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी लसीकरणासाठी रांगा लागल्याचं चित्र पहायला मिळत आहे. अशातच नांदेड Nanded जिल्ह्यात केलेले नियोजन फेल गेल्यानं लसीकरणाच्या नियोजनाचा पुरता बोजवारा उडाला आहे. Burden of vaccination in Nanded district

नांदेड जिल्ह्यात प्रशासनाच्या ढिसाळ नियोजन आणि लस Vaccine उपलब्ध नसल्याने लस घेणाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. लसीकरण केंद्रावर मोठ्या रांगा लागत आहेत आणि तासंतास थांबून ही लसीकरणा बाबत व्यवस्थित माहिती मिळत नसल्याने नागरिकांना लसीकरणा अभावी आपल्या घरी परतावे लागत आहे. जिल्ह्यात सुरवातीला 400 लसीकरण केंद्र उघडण्यात आली होती मात्र आता केवळ 89 केंद्रावर लसीकरण केले जात आहे. मात्र, कोव्हिन अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन Registration करुन ही लस मिळत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केले जात आहे.

हे देखील पहा -

दुसरा डोस घेणारे आणि 45 वर्ष वयाच्या वरील लोकांना प्राधान्यांने लस देण्याचे जाहीर केले मात्र, प्रत्यक्षात दुसऱ्या डोसचा कालावधी उलटून जात आहे. शिवाय वयोवृद्धांना केंद्रावर तासंतास थांबून ही लस मिळत नसल्याचे चित्र आहे. Burden of vaccination in Nanded district

सध्याघडीला जिल्ह्यात  केवळ 26 हजार लस उपलब्ध आहेत. त्यामुळे मागणी लाखांची आणि पुरवठा हजारात होत आहे. त्यातच प्रशासनाचा सावळा गोंधळ त्यामुळे लस घेणाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. एखाद्याला लस मिळाली तर एखादी लाॅटरीच तिकीट लागल्या सारखं वाटत आहे. यावर प्रशासन मात्र, लसीकरण सुरळीत सुरु आहे असे उत्तर देऊन मोकळे होत आहे.

Edited By - Shivani Tichkule

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com