देवगडमध्ये दोन बोटी गेल्या वाहून ;एका खलाशाचा मृत्यू तर तीन खलाशी बेपत्ता ( पहा व्हिडिओ )

देवगडमध्ये दोन बोटी गेल्या वाहून ;एका खलाशाचा मृत्यू तर तीन खलाशी बेपत्ता ( पहा व्हिडिओ )
Sindhudurg HIt by Tautkae Cyclone

सिंधुदुर्ग- तौत्के चक्रीवादळाच्या फटक्यामुळे देवगड Devgad तालुक्यातील आनंदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या दोन बोटी Boat वाहून गेल्याने बुडाल्या आहेत. या दुर्घटनेमध्ये राजाराम कृष्णा कदम या खलाशाचा मृत्यू झाला आहे. तर दीनानाथ जोशी, नंदकुमार नार्वेकर, प्रकाश गिरीद हे बेपत्ता Disappeared आहेत. तर जानू यशवंत डोर्लेकर, विलास सुरेश राघव, सूर्यकांत सायाजी सावंत हे सुखरूप बाहेर आले आहेत. Carrying two boats past Devgad taluka

याविषयी देवगड उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील Sudhir Patil यांच्याकडून मिळालेल्या माहिती नुसार काल दुपारी 3.30 वा. सुमारास आनंदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या रघुनाथ यशवंत कोयंडे यांच्या रुक्मिणी Rukamani या बोटीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे ती, पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे, वाहून जाऊ लागली.

त्यामुळे रुक्मिणी बोटीवरील खलाशांना वाचवण्यासाठी निरज यशवंत कोयंडे यांची आरची नावाची दुसरी बोट रुक्मिणी बोटी जवळ नेण्यात येत होती. पण, वादळी वाऱ्यामुळे आर्ची बोटीवरील खलाशांचे नियंत्रण सुटून दोन्ही मच्छिमार बोटी लगतच्या मौजे पालये किनाऱ्यावरील खडकावर आदळल्या. त्यानंतर दोन्ही बोटीवरील खलाशांनी पाण्यात उड्या मारल्या. या दोन्ही बोटींवर मिळून एकूण 7 खलाशी होते. Carrying two boats past Devgad taluka

यापैकी तीन खलाशी सुखरूप बाहेर आले. तर चार खलाशी वाहून गेले. यापैकी एका खलाशाचा मृतदेह आज सकाळी देवगड मळई येथील खाडीमध्ये आढळून आला आहे. स्थानिक प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक लोकांच्या सहकार्याने इतर तीन बेपत्ता खलाशांचा शोध सुरू आहे. तसेच या दुर्घटनेनंतर उपविभागीय अधिकारी ( महसूल ) यांनी बचावलेल्या खलाशांची भेट घेतली. सदरचे खलाशी हे मौजे पालये येथील सागर करंगुटकर यांच्या घरी सुखरूप असल्याचे कळाले.

Edited By - Shivani Tichkule

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com