भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल
mahesh landage

भोसरी विधानसभेचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्यासह 3 नगरसेवक आणि 40 ते 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कोरोना विरुद्ध नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी भोसरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे.  मुलीच्या लग्ना निमित्त मांडव डहाळे कार्यक्रमा दरम्यान नाचगाने करणे त्यांच्या  अंगलट आले आहे. 

दरम्यान,  भाजपचे (BJP) आमदार (MLA)  महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी त्यांच्या मुलीच्या लग्न (Marriage) समारंभातील (Function) मांडव टहाळ्याच्या कार्यक्रमात त्यांच्या समर्थकांसह कोरोना नियमांची पूर्णपणे पायमल्ली केली होती. या मांडव टहाळ्याचा कार्यक्रमात स्वतः महेश लांडगे भंडाऱ्यात नाहून नृत्य करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहेत. त्यांच्या मुलीचा विवाहसोहळा 6 जूनला होणार आहे. त्यापूर्वीच्या सोहळ्यात अपवाद वगळता आमदारांसह सगळेच विनामास्क वावरताना या व्हिडीओत दिसत आहेत.

हे देखील पाहा

तर सोशल डिस्टनसिंगचा पूर्णपणे फज्जा या कार्यक्रमात उडाला असल्याचे समोर आले आहे. मांडव टहाळ्याच्या कार्यक्रमासाठी वाजंत्री, बैलजोड्याचं आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्याना वेगळे आणि आमदार खासदार श्रीमंतांना वेगळे नियम आहेत का असा सवाल आता सामान्य नागरिक करत आहेत.
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com