भाईचा बड्डे पडला महागात; ५ मित्रांचे पोलिसांनी वाजवले बारा

भाईचा बड्डे पडला महागात; ५ मित्रांचे पोलिसांनी वाजवले बारा
cake.jpg

बुलढाणा: वाढदिवस Birthday म्हटलं की रस्त्यावर गाडी लावून केक Cake कापण्याचं नवं फॅड आजकाल तरुणांच्या डोक्यात शिरलं आहे. रात्री-अपरात्री रस्त्यावर आपल्या भाईचा बर्थडे साजरा करण्यात या तरुणांना मोठं थ्रील केल्यासारखं वाटतं. मात्र, पोलिसांनी खामगाव Khamgaon शहरात अशाच पाच ‘भाई वेड्यांचे’ बारा वाजवले आहेत. रस्त्यावर गाडी लावून केक कापल्याने पोलिसांनी Police त्यांना चांगलाच इंगा दाखवला आहे. पोलिसांनी रात्री अपरात्री घोळका जमवून वाढदिवस साजरा करणाऱ्या या ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. A case has been registered against the five for celebrating their birthdays on road

खामगाव शहरातील बाळापूर फाईल सुदर्शन चौकात काही युवक एकत्र जमून वाढदिवस साजरा करत होते. अशी माहिती शहर पोलीस ठाण्याला मिळाली. माहिती मिळताच रात्री पेट्रोलिंगसाठी तैनात असलेले पोलीस अधिकारी सुदर्शन चौकात तातडीने पोहोचले. 

तर त्या ठिकाणी ५ जण रस्त्यावर गाडी आडवी लावून गाण्याच्या ठेक्यावर तोंडाला मास्क Mask न लावता डान्स करीत केक कापत असल्याचे पोलिसांना यावेळी दिसूनआले.

पोलीस आल्याचे लक्षात येताच, सगळे जण पळून जात असतांना पोलिसांनी "बर्थडे बॉय" रोहन संजय बामणेट याला तलवारीसह पकडण्यात यश आले. तर बाकीचे ४ फारर झाले आहेत. या प्रकरणी बर्थडे बॉय रोहन सह ५ युवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com