रिपब्लिकन पार्टी जिल्हा अध्यक्ष आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल

रिपब्लिकन पार्टी जिल्हा अध्यक्ष आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल
A case has been registered against Republican Party district president and former corporator Ashok Kamble

सांगली : मिरजेच्या Miraj रिपब्लिकन पार्टी युवाआघाडी जिल्हा अध्यक्ष आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे Ashok Kamble आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीवर मारहाण शिवीगाळ आणि विनयभंग  केल्या प्रकरणी मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे..अशोक कांबळे यांच्या पहिल्या पत्नीने हा गुन्हा दाखल केला आहे.. A case has been registered against Republican Party district president and former corporator Ashok Kamble

अशोक कांबळे यांची पहिली पत्नी ही भाजी खरेदी साठी मार्केट मध्ये गेली असता, तिथे त्यावेळेस तिला अशोक कांबळे हे एका महिलेसोबत आढळून आले..  यावर त्यांच्या पत्नीने चार महिने घरी आले नाहीत.. घरी चला असे अशोक कांबळे यांना घरी चलण्यास विनंती केली. 

हे देखील पहा -

यावेळी दुसऱ्या पत्नीने पहिल्या पत्नीला सांगितले कि, ४ महिन्यापूर्वी आमचे लग्न झाले आहे आणि अशोक कांबळे हे माझे पती आहेत. यावर त्यांच्यात वाद झाला आणि त्यांनी पहिल्या पत्नीला मारहाण शिवीगाळ करून तिचे कपडे फाडले.

अशी तक्रार पहिल्या पत्नीने अशोक कांबळे आणि दुसऱ्या पत्नीवर केली आहे. याबाबत मिरज शहर पोलिसात अशोक कांबळे आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीवर मारहाण शिवीगाळ करून विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे..

Edited By- Sanika Gade


 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com