Breaking देशातल्या १५० जिल्ह्यांत लाॅकडाऊनचा केंद्राचा विचार

Breaking देशातल्या १५० जिल्ह्यांत लाॅकडाऊनचा केंद्राचा विचार
Lock Down

नवी दिल्ली : देशात वाढणाऱ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जिल्हास्तरीय लॉकडाऊन Lock Down प्रस्ताव तयार केला आहे. देशातल्या १५० जिल्ह्यांत लवकरच लाॅकडाऊन लावण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. Center Thinking of Lock Down in Hundred and Fifty Districts

याबाबत केंद्र सरकार या संदर्भात विविध राज्यांशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेईल  मागील वर्षी देशात लॉकडाउन लागू झाल्यानंतर कोरोनाची Corona पहिली लाट आली. याचा थेट परिणाम देशाच्या अर्थकारणावर झाला. त्यामुळे जिल्हास्तरावर कुलूपबंदीचा विचार केला जात आहे. या संदर्भात आरोग्य मंत्रालयाने एक प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावानुसार, ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण १५ टक्कांपेक्षा जास्त आहे, अशा ठिकाणी लॉकडाउनच्या शिफारसीचा प्रस्ताव आहे.

या लॉकडाउन प्रस्तावात आवश्यक सेवा वगळल्या आहेत. कोरोना संसर्गाचे प्रमाण  जर १५ टक्के  पेक्षा जास्त आहेत, असे १५० च्या जवळपास जिल्हे असू शकतात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या Health Ministry बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली होती. या जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन लागू न केल्यास आरोग्य सेवांवर दबाव वाढेल आणि कोविड संसर्ग थांबविणे कठीण होईल, अशी ही चर्चा झाल्याची माहीती मिळते आहे. Center Thinking of Lock Down in Hundred and Fifty Districts

या जिल्ह्यांमध्ये   लॉकडाउन करण्याची वेळ आली  तर अचानक होणार नाही. केंद्र सरकार या संदर्भातील राज्य सरकारशी चर्चा करील ,आणि  मग अंतिम निर्णय घेईल, असे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र Maharsshtra, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड आणि तामिळनाडू या ८ राज्यांमध्ये  सर्वाधिक कोरोना संक्रमित रुग्ण  आहेत.
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com