आ. चंद्रकांत पाटील यांना मानसिक उपचारांची गरज - अशोक चव्हाण
ashok chavan and chandrkant

आ. चंद्रकांत पाटील यांना मानसिक उपचारांची गरज - अशोक चव्हाण

मुंबई - सत्ता गेल्याचे नैराश्य, पुन्हा सत्ता मिळत नसल्याची हतबलता आणि मराठा आरक्षणाच्या फुलप्रुफतेचा सर्वोच्च न्यायालयात भंडाफोड झाल्याने भाजपचे BJP प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील Chandrakant Patil  यांच्या मानसिक आरोग्यावर Mental Health परिणाम झाला आहे. असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण Ashok Chavan यांनी ट्विट Tweet करत चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे. Chandrakant Patil needs treatment says Ashok Chavan

अशोक चव्हाण यांनी काही वेळा पूर्वीच ट्विट करत चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. अशोक चव्हाण ट्विट मध्ये म्हणाले की,  सत्ता गेल्याचे नैराश्य, पुन्हा सत्ता मिळत नसल्याची हतबलता आणि मराठा आरक्षणाच्या 'फुलप्रुफ'तेचा सर्वोच्च न्यायालयात भंडाफोड झाल्याने आ. चंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ते बेताल विधाने करीत असून त्यांनी चांगले मानसिक उपचार घेण्याची नितांत गरज आहे.

हे देखील पहा -

मराठा आरक्षण प्रकरणासंदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी पातळी सोडून केलेल्या टीकेला उत्तर देताना ते बोलत होते. भाजपला सत्ता गेल्याचे नैराश्य होतेच. सतत तारखा देऊन महाविकास आघाडी सरकार अस्थिर होत नसल्याने हतबलताही आलेली होती.

वरून मराठा आरक्षणाबाबत भाजपने केलेल्या खोट्या दाव्यांचा सर्वोच्च न्यायालयानेच भांडाफोड केल्याने चंद्रकांत पाटील सैरभैर झाले आहेत. Chandrakant Patil needs treatment says Ashok Chavan

या प्रचंड ताणतणावामुळे नेमके काय बोलावे हे कळेनासे झाल्याने शब्द निवडताना सतत त्यांचा तोल सुटतो आहे. पण योग्य मानसिक उपचारातून या समस्येवर नक्कीच मार्ग निघू शकेल, अशी मला अपेक्षा असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com