छगन भुजबळांचे आंदोलन ही नौटंकी आहे - चंद्रशेखर बावनकुळे

छगन भुजबळांचे आंदोलन ही नौटंकी आहे - चंद्रशेखर बावनकुळे
bavankule

नागपूर  - ओबीसी OBC आरक्षणाच्या प्रश्नावर छगन भुजबळ Chhagan Bhujbal  यांनी आंदोलनाची घोषणा केली ही भुजबळांची नौटंकी आहे. महाविकास आघाडी सरकारमुळे आरक्षण गेलं, मग छगन भुजबळ यांची नौटंकी कशासाठी? असा प्रश्न भाजपचे प्रदेश सरचीटणीस चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांनी उपस्थित केला आहे. Chandrashekhar Bawankule allegations on Chhagan Bhujbal 

ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार Vijay Vadettiwar यांनी महिनाभरात डाटा गोळा करण्याबाबत सांगितले, मग छगन भुजबळांचे हे आंदोलन नौटंकी आहे. असा आरोप करत आरक्षण मिळालं नाही, तर ओबीसी समाज राज्यात निवडणूका होऊ देणार नाही. असा इशाराही बावनकुळे यांनी दिला आहे. 

 हे देखील पहा -

14 महिने होऊनही इंपेरिकल डाटा महाविकास आघाडी सरकारने तयार केला नाही. तेवढेच काय स्वतः विजय वडेट्टीवार यांनी महिनाभरापूर्वी इंपेरिकल डाटातयार करण्याची घोषणा केली होती, तीही हवेत विरली. ओबीसी प्रश्नात राज्य सरकार फक्त नौटंकी असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com