कॅथलिक चर्चशी संबंधित कायद्यांमध्ये बदल 

 कॅथलिक चर्चशी संबंधित कायद्यांमध्ये बदल 
pop

मंगळवारी पोप फ्रान्सिसने कॅथोलिक चर्चशी संबंधित कायद्यांमध्ये मोठे बदल केले. हे गेल्या चार दशकांतील सर्वात मोठे बदल असल्याचे सांगितले जात आहे. चर्चच्या कायद्यांमधील बदलानंतर, पाद्रींसाठी नियम अधिकच कठोर बनवले आहेत. कायद्यातले सर्वात मोठे बदल अल्पवयीन, कमजोर महिला लक्षात घेऊन केले गेले आहेत. माहितीनुसार, कायदे बदलण्याची प्रक्रिया २००९  पासून सुरू होती, त्यात चर्चच्या कॅनॉन कायद्यातील सर्व ६ विभाग तसेच ७ पुस्तकांच्या १७५० लेखांचा समावेश आहे. चर्चच्या कायद्यांमध्ये असा मोठा बदल पोप जॉन पॉल यांनी 1983 मध्ये केला होता. त्यानंतरची ही सर्वात मोठी दुरुस्ती आहे.(Changes in the law relating to the Catholic Church)

पोप यांनी आपल्या संदेशात पाद्रींना आठवण करून दिली की कायद्याचे पालन करणे ही पाद्रींची जबाबदारी आहे आणि जे नवीन बदल केले गेले आहेत. या बदलाचे उद्दीष्ट फक्त अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये कमी करणे आहे ज्यात शिक्षेची तरतूद फक्त सार्वजनिक संस्थांमध्ये आहे. नवीन चर्च कायद्यात गुन्हा आणि शिक्षेशी संबंधित सुमारे 80 लेख आहेत.  तसेच 1983 मधील चर्च कायद्यात बदल आणि काही नवीन नियमांचादेखील उल्लेख आहे.

हे देखील पाहा

कायद्यांमध्ये सुधारणा करण्याच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवणारे व्हॅटिकनचे प्रमुख मॉन्सिनॉर फिलिपो इयानॉन म्हणाले की, "निकाल देताना शिक्षेपेक्षा दयेला महत्व दिले गेले असे अनेकदा दिसून आले आहे''.  इथून पुढे अल्पवयीन मुलीवर होणारे अत्याचार "मानवी जीवन, सन्मान आणि स्वातंत्र्याविरुद्ध  गुन्हा" या श्रेणीत येईल, तर आधी ते फक्त "जबाबदार्‍यांविरूद्ध" या कायद्याखाली येत होता''.(Changes in the law relating to the Catholic Church)

Edited By : Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com