मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार, करणार महत्वाची घोषणा ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार, करणार महत्वाची घोषणा ?
ud

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackery आज राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. फेसबुक लाईव्हच्या  Facebook माध्यमातून उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. कालच लॉकडाऊन Lockdown वाढवण्याची घोषणा करण्यात आली त्यामुळे भविष्यातील राज्याची दिशा कशी असेल?,  लॉकडाऊन,वाढता कोरोनाचा संसर्ग, लसीकरण यासह विविध अशा मुद्द्यांवर मुख्यमंत्री CM आज राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे.

तसेच  मुखमंत्री उद्धव ठाकरे आज एक महत्त्वाची घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आता काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. लॉकडाऊनच्या काळात उद्योग-व्यवसाय बंद असल्यामुळे राज्याचे मोठे नुकसान होत आहे. राज्य सरकारने काही घटकांसाठी मदत जाहीर केली आहेपण ती अत्यल्प आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखताना अर्थव्यवस्थेचं चाक सुद्धा रुतणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्या दृष्टीने उद्धव ठाकरे काय बोलतात? याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.  

आज लॉकडाउनचा पहिला टप्पा संपत असताना आणखी १५ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या कमी झालेली नसली तरी मुंबई, पुणे या सारख्या मोठ्या शहरात रुग्णसंख्या स्थिरावल्याचे दिसून येत आहे.  दुसरीकडे देशभरात उद्यापासून म्हणजेच १ मे २०२१ पासून 18 वर्षांवरील व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. या  मुद्द्यावर मुख्यमंत्री आज बोलण्याची शक्यता आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com