3 वर्षावरील मुलांना लसीकरणाची मान्यता देणारा चीन ठरला पहिला देश 
China became the first country to giving vaccination children above 3 years of age

3 वर्षावरील मुलांना लसीकरणाची मान्यता देणारा चीन ठरला पहिला देश 

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ३ ते १७ वयोगटातील मुलांसाठी लसींच्या तातडीच्या वापरास मान्यता देणारा चीन China पहिला देश ठरला आहे. सिनोव्हाक बायोटेकची कोविड -१९ Covid 19 ही लस मुलांना दिली जाईल, असे कंपनीचे चेअरमन यिन वेडोंग यांनी माहिती दिली आहे. China became the first country to giving vaccination children above 3 years of age

सिनोव्हॅक Sinovac Biotech's असे म्हटले होते की त्यांची लस तरुण लोकांसाठी वापरण्यास सुरक्षित आहे आणि फेज १ आणि २ क्लिनिकल चाचण्यांमधून असेही दिसून आले आहे की लसीमुळे ३-१७ वर्षे वयोगटातील लसीच्या चाचणी मध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती सुद्धा निर्माण झाली आहे. 

आरोग्य अधिकारी रोगप्रतिबंधक लस टोचण्याचे धोरण कसे तयार करतात, यावर लसीकरण अवलंबून असेल. चीनमधूनच कोरोनाचा उगम  झालेला आहे. जगभरात या महामारीने हाहा:कार माजवला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हेच धोरण सरकारने ठरवले आहे. सध्या प्रत्येक देशात लसीकरण सुरु केलं आहे.  लसीकरण १८ वर्षांवरील नागरिकांचं सुरु आहे. परंतु चीनने मात्र ३ ते १७ या वयोगटातील लहान आणि पौगंडावस्थेतील मुलांना लसीकरणासाठी आपतकालीन मंजुरी दिली आहे. 

लवकरच आणखी एक लस चीनमध्ये लहान मुलांसाठी तयार होणार येणार आहे. येथील कॅनसिनो CanSino बायोलॉजिक्स कोरोना प्रतिबंधक लसीचे सध्या क्लिनिकल ट्रायल चालू आहे.  सध्या ६ ते १७ या वयोगटातील मुलासांठी या लसीचं फेज २ चे क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. 

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com