पूर्व लडाखमध्ये चीनच्या हवाई दलाचा युद्धाभ्यास; भारताची चिंता वाढली  

पूर्व लडाखमध्ये चीनच्या हवाई दलाचा युद्धाभ्यास; भारताची चिंता वाढली  
china.jpg

वृत्तसंस्था : गेल्या एक वर्षाहून अधिक काळापासून पूर्व लडाखच्या eastern Ladakh सीमेवर भारत आणि चीनमध्ये प्रचंड तणाव सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये बऱ्याच चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, सुरुवातीच्या  काळात बऱ्याच चर्चा झाल्यानंतर चीनी सैन्याने माघार घेतली होती. त्यामुळे थोडा तनाव कमी झाला होता.  मात्र, आता पुनः एकदा चीनने पुन्हा मुजोरी  करत चिथावणी दिली आहे. चीनने आपल्या हवाई दलाचा युद्धाभ्यास केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे भारताच्या चिंतेत पुनः भर पडली आहे.  (The Chinese air force conducted war games in eastern Ladakh) 

- सुमारे 2 डझन लढाऊ विमानांनी केला सराव
संरक्षण सूत्रांचे म्हणणे आहे की, चीनी सैन्याच्या या युद्धाभ्यासात सुमारे 21-22 चिनी लढाऊ विमानांनी भाग घेतला होता. यामध्ये प्रामुख्याने जे -11 चा समावेश होता. याशिवाय जे -16 विमानही उड्डाण करताना दिसत होते. भारतीय सैन्यसुद्धा पूर्णपणे सतर्क असून चीनच्या कृत्यावर बारीक नजर ठेवून आहे. चीनची ही कारवाई पाहता भारतीय सैन्याने गेल्या वर्षापासून सीमेवर मोठ्या संख्येने सैनिक आणि लढाऊ विमान तैनात केले आहेत.

 दरम्यान,  या युद्धाभ्यासादरम्यान चिनी लढाऊ विमान त्यांच्या कक्षेत होते.  ड्रॅगनवर अवलंबून नसले तरी भारतीय सैन्य कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहे. तसेच, तेव्हापासून भारतीय सैन्य सतर्कतेच्या मार्गावर असून चीनच्या कार्यांवर लक्ष ठेवून आहे. अशी प्रतिक्रिया भारतीय सैन्याने दिली आहे 

Edited By - Anuradha Dhawade 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com