चंद्रपुरात चक्क दारू विक्रेत्याच्या घरीच नागरिकांचा हल्लाबोल

चंद्रपुरात चक्क दारू विक्रेत्याच्या घरीच नागरिकांचा हल्लाबोल
Citizens filed complaint against illegal liquor dealer in Chandrapur

चंद्रपूर : सततची अवैध दारू विक्री Illegal sale of alcohol आणि त्यातून स्थानिक नागरिकांवर होत असलेली दादागिरी याविरोधात चंद्रपूर Chandrapur शहरातील इंदिरानगरचे नागरिक आज अखेर संतापले आहेत. त्यामुळे त्यांनी चक्क दारू विक्रेत्याच्या घरीच हल्लाबोल केला. चंद्रपूर जिल्ह्यात 2015 पासून दारूबंदी आहे. परंतु चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री मोठा व्यवसाय झाली आहे. शेवटी संतापून, धमक्यांना कंटाळून नागरिकनांनी एकत्र येत पोलिसांकडे Police याची तक्रार केली आहे. Citizens filed complaint against illegal liquor dealer in Chandrapur

या ना त्या मार्गाने चंद्रपूर जिल्ह्यात दारू तस्करी Smuggling केली जाते. आरोपी पकडले जातात. कोट्यवधीचा मुद्देमाल जप्त होतो . तरीही दारूचे प्रमाण वाढतच चालले. आता चंद्रपूर जिल्ह्याच्या विविध भागात विकली जाणारी अवैध दारू परिसरातील नागरिकांची डोकेदुखी ठरली आहे. शहरातील इंदिरानगर भागातील नागरिकांच्या संयमाचा बांध आज फुटला. या भागात प्रचंड दारू विकली जाते, असा आरोप तेथील रहिवाशांनी केला आहे. 

हे देखील पहा -

याची तक्रार देखील पोलीस अधीक्षकांना केली आहे. पण दारू विक्रेते शिरजोर झाले आहेत. नागरिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर जीवे मारण्याची धमकी Death threats सुद्धा देतात. दारू विकणारे आणि पिणारे आमच्या घराच्या परिसरात गोंधळ घालत असून जीवे मारण्याची धमकी देतात, असेही आरोप येथील रहिवाशांनी केले.

यासंदर्भात योग्य ती कारवाई झाली नाही. त्यामुळे नागरिकांनी आज दारू विक्रेत्याच्या घरावर हल्लाबोल केला. यासोबतच त्यांना यापुढे जर दारू विकाल तर आम्ही घरात घुसून मारू, अशी ताकीद दिली. पोलिसांनी मात्र नियमानुसार कारवाई करू, असे छापील उत्तर दिले.

Edited By- Sanika  Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com