संचारबंदीच्या काळात मुक्तपणे बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची आता होणार कोरोना चाचणी ...
Corona test

संचारबंदीच्या काळात मुक्तपणे बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची आता होणार कोरोना चाचणी ...

अमरावती : कोरोना Corona विषाणूचा प्रादुर्भाव अमरावतीत दिवसेंदिवस वाढत चाले असून याला कुठे तरी आळा बसावा, या करीता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. परंतु अमरावती Amravati जिल्ह्यातही हा नियम लागू झाला आहे. मात्र तेथील व्यापारी आणि मजूर वर्ग याची दखल घेत नसल्याचे दिसून आले आहे. संचार बंदीच्या curfew काळात पहिल्याचं दिवशी अमरावती शहरात पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. Citizens who move freely during curfew will now undergo corona test ...

या लॉकडाउनला Lockdown लोक चांगला प्रतिसाद देत नसल्यामुळे प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. शहरात संचारबंदीच्या काळात मुक्तपणे फिरणाऱ्या नागरिकांना पकडून त्यांची कोरोना चाचणी करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. या टेस्टचा चा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्या नागरिकाला कोविड मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे आता तरी संचारबंदीच्या काळात फिरणाऱ्यांची संख्या कमी होईल, आणि नागरिक घरात बसणे, पसंत करतील अशी अपेक्षा जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com