स्वच्छता कर्मचाऱ्याने झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या
The cleaning worker committed suicide by hanging himself from a tree

स्वच्छता कर्मचाऱ्याने झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या

लातूर - लातूर जिल्ह्यातील Latur District निलंगा नगर पालिकेत 55 वर्षांच्या स्वच्छता कर्मचाऱ्याने cleaning worker महापालिकेसमोर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.  (The cleaning worker committed suicide by hanging himself from a tree)

बाबूराव गायकवाड हे निलंगा नगर पालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत होते. गेल्या 7 महिन्यांपासून त्यांचा पगार झाला नव्हता. सकाळी 5 वाजता कामावर जाण्यासाठी ते घरातून बाहेर  पडले होते. नगर पालिकेच्या जवळच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

हे देखील पहा - 

त्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी नगर पालिका अधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्या विरूद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. तसेच तातडीने आपल्या मुलाला त्वरित कामावर घेण्याची मागणी केली.

मृताच्या मुलाला तातडीने कामावर घेतले जाईल आणि जास्तीत जास्त मदत देण्याची घोषणा करण्यात येत असल्याची माहिती नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्रीकांत शिंगाडे यांनी दिली आहे. 

तसेच कॉंग्रेसचे अभय साळुंके यांनी माजी मंत्री आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर आरोप केले आणि म्हटले की या गरीब मजुराला अन्न मिळत नाही, मग गरीब मजूर काय खाणार, कसे जगायचे याकडे लक्ष दिले जात नाही.

बाबुराव गायकवाड यांनी हे पाऊल फक्त पगार वेळेवर न मिळाल्याने  उचलले. यास जबाबदार असलेले नगराध्यक्ष श्रीकांत शिंगाडे व नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

Edited By - Puja Bonkile 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com