आषाढीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना  निमंत्रण

आषाढीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना  निमंत्रण
Uddhav Thackeray to Perform Pandharpur Mahapooja

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात येणार आहे. यात्रा काळात शासनाने मंदिर दर्शनासाठी  खुले करण्यास परवानगी दिल्यास  प्रतिपदा ते पोर्णिमे पर्यंत मंदिर दर्शनासाठी 24 तास  सुरु ठेवण्यात येईल, अशी माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आज दिली. Cm Uddhav Thackeray to be Invited for Aashadhi Ekadashi Mahapooja

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीची आज येथील भक्त निवास मध्ये कोरोनाचे सर्व नियम पाळून बैठक झाली.  बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आषाढी यात्रे संदर्भात घेण्यात आलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली.

यावेळी औसेकर महाराज म्हणाले की,  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रे बाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. तरीही आषाढी यात्रेच्या निमित्ताने  येणाऱ्या भाविक व महाराज मंडळींच्या दर्शनाचीसोय मंदिर समितीच्या वतीने  केली जाणार आहे. येत्या 20 जुलै रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा आहे. प्रथा परंपरेनुसार आषाढी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांच्या  हस्ते केली जाते.Cm Uddhav Thackeray to be Invited for Aashadhi Ekadashi Mahapooja

यावर्षीही विठ्ठल रुक्मिणी मातेच्या आषाढी   महापूजेसाठी मुख्यमंत्री  उध्दव ठाकरे यांना  रितसर निमंत्रण देण्यात येणार आहे. त्यांची प्रत्यक्ष भेट घेवून महापूजेसाठी पंढरपुराला यावे अशी   विनंती देखील केली जाणार आहे.

आषाढी एकादशीच्या दिवशी मनाच्या 18 पालखी प्रमुखांना देवाला नैवद्य दाखविण्याची परवानगी  देण्यात आली आहे. शिवाय वारकरी,फडकरी, दिंडीकरी, विणेकरी अशा 195 प्रमुख वारकर्यांना आषाढीच्या दिवशी दर्शनाची सोय  केली जाणार आहे. शिवाय विविध संताच्या पादुका आणि देव यांच्या भेटीची परंपरा यावर्षीही कायम ठेवण्यात येणार आहे. Cm Uddhav Thackeray to be Invited for Aashadhi Ekadashi Mahapooja

12 जुलै रोजी देवाचा पलंग काढण्यात येणार आहे. त्यानंतर शासनाने परवानगी दिली तर मंदिर भाविकांसाठी 24 तास दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय ही या बैठकीत घेण्यात आल्याचे गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. बैठकीला मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, शकुंतला नडगिरे, शाधना भोसले, मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते. तर अन्य सदस्य व्हीडीओ काॅन्फरन्सद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com